विभागीय वन अधिकाऱ्याचे पत्र धुळे वनसंरक्षककडे
यावल ( सुरेश पाटील ) हतनुर धरणाचा पाट यावल रावेर तालुक्यातून चोपडा तालुक्यात गेलेला आहे या पाटाच्या आजूबाजूच्या परिसरातील १० ते १५ वयोगटाची झाडे हतनुर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिना परवानगीने तसेच जेसीबी, पोकलेंड इत्यादी अत्याधुनिक मशीनरीने तोडल्याने दाखल तक्रार नुसार नागपूर येथील विभागीय वन अधिकारी ( संरक्षण ) अपर प्रधान मुख्य वन संरक्षक ( संरक्षण ) यांनी चौकशी सुरू केली असून त्याबाबतचे लेखी पत्र धुळे येथील वनसंरक्षक प्रादेशिक यांना प्राप्त झाल्याने संपूर्ण हतनूर आणि जळगाव पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की नशिराबाद तालुका जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी १९ डिसेंबर २०२३ रोजी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते की, यांत्रिकी विभागीय पथक जळगाव कार्यालया मार्फत हतनूर कालवा परिसरात हतनूर धरण ते चोपडा कालवा म्हणजे रावेर ते चोपडा तालुक्यापर्यंत कालव्याच्या परिसरात असलेली झाडे अंदाजे दहा ते पंधरा वर्षे वयाची झाडे जेसीबी आणि पोकलेंड इत्यादी अत्याधुनिक मशीनरीने काढली जात आहे अशी तक्रार केली होती.[ads id="ads2"]
त्यानुसार नागपूर येथील विभागीय वन अधिकारी संरक्षण यांनी धुळे येथील वन संरक्षक प्रादेशिक यांना लेखी पत्र देऊन चौकशी करून चौकशी अहवाल अभिप्रायासह नागपूर कार्यालयास विना विलंब सादर करावा असे आदेश वजा पत्र दिल्याने जळगाव पाटबंधारे विभागा सह हतनूर पाटबंधारे विभागात मोठी खळबळ उडाली. तसेच धुळे येथील वनसंरक्षक प्रादेशिक हे चौकशी अहवाल वस्तुस्थितीला धरून पाठविणार किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.