यावल ( सुरेश पाटील )
६ जून २०२४ रोजी यावल येथील ऐतिहासिक किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अभय रावते यांनी यावल शहरातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेऊन मिरवणूक कार्यक्रमासाठी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड केली.मिरवणूक अध्यक्षपदी प्रथमच प्राची पाठक या सक्रिय महिलेची अध्यक्ष म्हणून निवड केली.[ads id="ads1"]
एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ निमित्त यावल शहरात श्री रेणुका माता मंदिरात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक घेण्यात आली.. या बैठकीमध्ये शहरातील विविध भागातील शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवली ..या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी डॉ.अभय रावते यांनी सोहळ्याचे,विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्वांनुमाते संघटनेमार्फत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.[ads id="ads2"]
बैठकीचे विशेष ठरले ते म्हणजे अध्यक्षांची नेमणूक.. यावल शहरात पहिल्यांदा एखाद्या मिरवणुकीसाठी महिलेची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली.. एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभय रावते यांच्या आग्रहावर प्राची ताई पाठक यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.. व या साठी सर्व उपस्थित शिवभक्तांनी पाठिंबा दर्शविला... तसेच
उपाध्यक्ष- अजय तायडे
खजिनदार- दीपक वारुळकर
कार्याध्यक्ष -गोलू बारी
सचिव -पंकज जोहरी
संघटन प्रमुख - चेतन बारी
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.