चिनावल येथील नूतन विद्यालयात (Nutan Madhyamik vidyalaya Chinawal) ही बैठक झाली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, रावेर तहसीलदार (Raver Tahsildar) बंडू कापसे, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) राज कुमार शिंदे, सावदा पो स्टे चे सपोनी जालिंदर पळे यांचे सह Chinawal गावातील प्रमुख पदाधिकारी जबाबदार नागरिक उपस्थित होते. सदर वेळी गावात शांतता राखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयी चर्चा झाली. गावकरी यांनी आपल्या भावना मांडल्या. सदर वेळी नखाते यांनी सदर घटनेतील आरोपी शोधून कायदेशीर कारवाई तर करणारच आहे, मात्र या पुढे असे घडता कामा नये कोणी जर आपल्याला भडकवत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका अंशी तंबी दिली.
दरम्यान सदर घटना ही दिनांक १७ मे च्या रात्री चिनावल येथे झालेल्या दगडफेक नतंर Chinawal येथे सुरू असलेल्या ३ दिवसांच्या संचारबंदीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र शेतकरी शेतमजूर यांना शेतातील कामे करता यावी यासाठी सकाळी ७ ते ८ व दुपारी परत येण्यासाठी १२ ते १ अशा दोन तासाची प्रशासनाने शिथीलता दिल्याने ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला. उर्वरित वेळेत तिसऱ्या दिवशीही सर्वत्र शुकशुकाट व शांतता होती.[ads id="ads2"]
दरम्यान दिनांक १७ मे शुक्रवार रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या चिनावल (Chinawal Taluka Raver Dist Jalgaon) येथिल प्रचंड दगडफेकीत पळापळ, मोटरसायकल, मोठ्या चारचाकी गाड्या तसेच महिलांचा विनयभंग अशा पद्धतीने घटना घडल्याचे दोन वेगवेगळ्या फिर्यादि सावदा पोलिसात दाखल झाल्या होत्या. दरम्यान दि १८ ला सकाळी २ वाजेच्या सुमारास माधुरी युवराज महाजन यांनी पहीली तक्रार दाखल केली. तर दिनांक १९ मे च्या रात्री पोलिस नाईक मझरखान पठान यांनी दुसरी फिर्याद दाखल केली. अशा दोन वेगवेगळ्या फिर्याद दाखल झाल्या आहे. यात पहिल्या फिर्यादित माधुरी महाजन यांनी मी व माझे सोबत वर्षा महाजन वाॅकिग करीत असताना मेस्को मळा तसेच महादेव वाडा परिसरात आरडाओरडा चालू असल्याचे लक्षात आले. तर आमचे मेस्को मळाचे बोळातून जमाव पळत येऊन दगडफेक करीत होता. यात आम्हा दोघा महिलांना लज्जा वाटेल असं कृत्य ह्या लोकांनी करीत माझे २ तोळ्याचे मंगळसूत्र तोडले. तसेच दगडफेक करीत मोटरसायकल व चारचाकी गाड्या चे नुकसान केले, अशा आशयाची फिर्याद दिली. त्या मुळे सावदा पो स्टेशनला गुन्हा दाखल होवून भादवी कलम ३९२, ३५४, ४२७, ३४, १४३, १ ४७, १४९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या फिर्याद मध्ये याच दगडफेक दरम्यान पोलिस नाईक मझरखान पठान यांच्या पोटावर विट लागली. त्यात एका पोलिस कर्मचारीला धक्का बुक्की करण्यात आली अशी फिर्याद दिली आहे. या वरून भादवि कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९ प्रमाणे नोंद करण्यात आली.आहे. यात दोन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, तर आज तिसऱ्या दिवशी चिनावल गावात कोणतीही दुकाने व आस्थापने सुरू नसल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.
Chinawal चिनावल गावात जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पो स्टेशन चे सपोनी जालिंदर पळे, पो उप निरीक्षक खांडबहाले, गर्जे, हे आजही तळ ठोकून आहेत. दि २० रोजी संचारबंदी मध्यरात्री संपली.