यावल (सुरेश पाटील)
बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अनेक पेट्रोल पंपावर प्लास्टिक कॅना मध्ये पेट्रोल डिझेल भरून भरून सर्रासपणे विक्री होत आहे याकडे रावेर यावल आणि चोपडा येथील तहसीलदारांसह पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे तसेच काही ठराविक पेट्रोल पंपावरून रात्रीच्या वेळेस अवैध वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या काही पेट्रोल पंप चालकांकडून शासन, महसूल,तसेच पेट्रोल डिझेल कंपनीच्या सर्व अटी शर्ती खड्ड्यात घालून अनेक ग्राहकांना १० ते ३५ लिटरच्या कॅन मध्ये पेट्रोल,डिझेल भरून भरून विक्री करत आहेत आणि याचे प्रत्यक्ष पुरावे त्याच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतील आणि इत्यादी प्रकार इतर ग्राहकांच्या समोर घडत असतात, पुरवठा विभागाने कधी चौकशी आणि खात्री केली आहे का.? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी याकडे मात्र तहसीलदार आणि पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने एखाद्या वेळेस रस्त्याने किंवा ज्या ठिकाणी ज्या गावात पेट्रोल,डिझेल पुरवठा, किंवा किरकोळ विक्रीसाठी साठा होतो.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी मोठी अप्रिय घटना घडवू शकते,याच प्रमाणे काही ठराविक पेट्रोल पंप परिसरात दोन नंबर व्यावसायिक आपल्या अवैध धंद्यासाठी वापरली जाणारी वाहने पार्किंग करून ठेवत असल्याने आणि सोयीनुसार त्या वाहनांचा वापर करीत असल्याने महामार्गावर अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि काही ठिकाणी अपघात होत आहेत,अनेक ठिकाणी अवैध पार्किंग केलेल्या वाहनांच्या माध्यमातून अवैध धंदे सुरू आहेत याकडे सुद्धा महसूल विभागासह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी आपले लक्ष केंद्रित करून तात्काळ कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.