यावल ( सुरेश पाटील )
लोकसभा निवडणुक निमित्त साधून रावेर लोकसभा मतदारसंघात लोकशाही राज्यात एका उमेदवाराच्या समर्थकाने आपल्याच उमेदवाराची दिशाभूल करीत काही ठराविक स्टॅंडर्ड नावाजलेल्या प्रसिद्ध कंपनीच्या लेखणी ऐवजी हलक्या दर्जाची लेखणी आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्याने संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात सर्व क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे.[ads id="ads1"]
लोकशाहीला प्राधान्य देणाऱ्या देशात रावेर लोकसभा मतदारसंघात एका आपल्या उमेदवाराला लाभ होण्यासाठी एका समर्थकाने मतदार संघात अंदाजे काही फक्त ४०० ते ५०० नगांची आपल्या सोयीनुसार यादी करून आणि आपल्याच उमेदवारांची दिशाभूल करून इतर काही ठराविक महत्त्वाचे मुद्दे आणि स्टॅंडर्ड / लोकप्रिय कंपनीचे पेन डावलून आपल्या खास पंटरांची पांचट शाईची लेखणी विकत घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.[ads id="ads2"]
आणि ती लेखणी सुद्धा ५ अंकाच्या आतील पाकिटात,हजारात लाचारीचा फायदा घेऊन विकत घेतल्याने इतक्या कमी किमतीचे आणि लाचारीचे पेन कसे आणि का..? कोणकोणते, आणि कोणासाठी विकले गेले..? आणि स्वाभिमाना नुसार योग्य किंमत मिळाली का..? याबाबत सर्व स्तरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी सत्य आणि वस्तुस्थिती मांडणारे पेन आणि कागद हे कदापी विकत घेऊ शकत नाही असे सुद्धा सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.