रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सद्या मे महिन्यामध्ये तापमान वाढण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नवीन केळी व इतर पीक लागवडीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु महावितरण कडून जो विद्युत पुरवठा मिळत आहे तो कमी प्रमाणात आहे व अनियमीत आहे. [ads id="ads1"]
त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होवू शकते. शेतकरी हिताच्या दृष्टिने आपण सकारात्मक विचार करुन विद्युत पुरवठा हा नियमित व १२ तासाचा करावा अश्या स्वरूपाचे निवेदन शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सोबत शिवसेना पदाधिकारी व शेतकरी वर्ग पीतांबर पाटील,भगवान पाटील,प्रवीण पंडित,कुणाल बागरे,मुकेश चौधरी,राजू लोहार,नितिन महाजन, आदी जन उपस्थित होते.


