रावेर तालुका प्रतिनिधी (मुबारक तडवी)
सामाजिक कार्यकर्ते दिलीप तडवीनीही केली आहे न.पा.पोलीसांकडे निवेदनाद्वारे तक्रार
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या रावेर तालुक्यातील सावदा -रावेर अतिशय वर्दळीच्या राज्य महामार्गावरील सावदा बस स्थानकासमोरील पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सायंकाळी 5५ ते ८ वाजेच्या दरम्यान सुरत, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक खाजगी प्रवासी वाहतूक लक्झरी बसेसनी आपला अनधिकृत थांबा बनविला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांचे तिकीट बुकिंग कार्यालय ऑफिसेस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर दररोज नियमित वाहतूक कोंडी होते.[ads id="ads1"]
याचा अधिक त्रास या मार्गावरील विविध आस्थापने व दवाखाने, नवीन वस्त्या प्लॉट एरिया सह गावखेड्यातील दुचाकी चारचाकी वाहनांनी कामानिमित्त अथवा परिसरातील पायी ये-जा करणा-या महिला पुरुष, वृद्ध व लहान मुलांसह दुचाकी वाल्याना नाहक सहन करावा लागतो. आधीच हा महामार्ग रस्ता वर्दळीचा असून, सध्या लग्नसराईची गर्दी, या गावातून त्या गावाला प्रवास करणाऱ्यांची गर्दीत भरपडली आहे. या बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या खाजगी बसेस मुळे दररोज होणारी वाहतूक कोंडीच्या कचाट्यात महामंडळाच्या एसटी बसेस,केळीमालाची वाहतूक करनारे ट्रक, ट्रॅक्टर मइनईडओअर आदी चारचाकीही सापडतात. [ads id="ads2"]
यामुळे येथील डीएन कॉलेज ते मोठा वाघोदा पर्यंतच्या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत असतात, वादविवाद होत असतो.तसेच सावदा फैजपुर दरम्यान रसीद आमद तडवी व सावदा कोचूर रस्त्यावर सलीम नवाज तडवी, सावदा मोठा वाघोदा - रावेर महामार्गावरील दरम्यान युनूस इक्बाल तडवी अशा मोठा वाघोदा येथील तीन तरुण केळी मजूर कामगारांनी अपघातात जीव गमावला आहे व त्या तीघाही मृतकाचे विधवा पत्नी मुले व कुटुंबीय आज ही खूप बिकट व हलाखीचे जीवन जगत आहेत तरी अशा बेशिस्त वाहतूक कोंडी दरम्यान सावदा पोलिस चौकी समोरच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून, दुर्दैवाने काही अनुचित प्रकार घडल्यास ही होणारी वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणारे संबंधित पोलिस व वाहतूक कोंडीस निमित्त बनलेल्या या खासगी बसेसचे चालक व मालकांसह या रस्त्यावर अवैधरित्या थांब्याची सुविधा उपलब्ध करून देत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी स्थानिक लक्डारी तिकीट बुकिंग दुकानदार हे जबाबदारी स्विकारतील का? तसेच या रस्त्यावर होणारी दररोजची वाहतूक कोंडी बाबत सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे अनभिज्ञ आहेत की काय?बस स्थानक समोरील पोलीस चौकी असून, ती नसल्यासारखी दिसून येते, येथे नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी चौकीऐवजी हॉटेल्स, गुरांच्या बाजार, कोचूर रोड या परिसरात गस्त घालण्यामागे व या वाहतूक कोंडीकडे त्यांचे दुर्लक्ष करण्या मागे अर्थपूर्ण हितसंबंध जपण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
"याच पद्धतीने डी.एन. कॉलेज ते सोमेश्वर नगर दरम्यान सावदा-फैजपुर रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळी लोडींगसाठी आलेल्या परप्रांतीय चारचाकी, दहाचाकी,बारा चाकी ट्रकच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात. हा प्रकारदेखील भविष्य जीवघेण्या अपघातास निमंत्रण देणारा आहे. तरी याकडे संबंधित यंत्रणांकडून लक्ष देण्याची अपेक्षा आहे.


