यावल ( सुरेश पाटील ) कृषी उत्पन्न बाजार समितीचे यावल येथे दोन मजली भव्य असे व्यापारी संकुल बांधण्यात आलेले आहे या संकुलनातील एका व्यापाऱ्याने खालच्या मजल्यावरील आपल्या ताब्यात असलेल्या तीन गाळे मधील छताची तोडफोड करून त्याच्याच ताब्यात असलेल्या वरच्या मजल्यावरील तीन दुकानात जाण्यासाठी व्यवस्था केल्याने संपूर्ण व्यापारी संकुलनातील इतर दुकानदारांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने कराराने दिलेल्या दुकानांमध्ये करार करून घेणाऱ्यांना दुकानांमध्ये तोडफोड करण्याची परवानगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केव्हा आणि कोणाकोणाला दिलेली आहे..? याबाबत संपूर्ण व्यापारी वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.[ads id="ads2"]
व्यापारी संकुलनात आवश्यक सुविधांची पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली जात नसल्याने,नियमित साफसफाई होत नसल्याने, पार्किंगची जागा नेमकी कुठे आहे,इत्यादी अनेक समस्यांबाबत व्यापारी वर्तुळात बाजार समिती विषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दुकानदाराने तोडफोड करण्याची परवानगी घेतली आहे किंवा कसे..? आणि परवानगी दिली नसेल तर यावल कृषी उत्पन्न बाजार समिती काय कारवाई करणार..? याबाबत सर्वांचे लक्ष वेधून आहे.


