रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील मौजे कुसुंबा खुर्द व कुसुंबा बुद्रूक या दोन गावांना जोडणारा व शाळकरी मुलांच्या वापराचा पुल सन 2006 मध्ये आलेल्या महापुरात वाहून गेला होता तो आजतागायत बांधण्यात आला नव्हता या करिता कुसुंबा खुर्द पेसा ग्राम पंचायत ने दिनांक 6/10/2023 रोजी झालेल्या ग्रामसभेत आगामी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता. व या ठरावाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी व मा. तहसीलदार यांना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने मान. जिल्हाधिकारी सो जळगांव यांनी भौतिक पायाभूत सुविधा, रस्ते ( अप्रत्यक्ष खाणबाधित क्षेत्र_उच्च प्राथम्य) या योजने अंतर्गत सदर पुलाचे बांधकाम करण्याकरिता १५ लाख रुपयांचा निधी मंजुर करून दिलेला असुन त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. [ads id="ads1"]
त्यामुळे मान. देवयानी यादव मॅडम उपविभागीय अधिकारी सो फैजपूर व मा. बंडूजी कापसे साहेब यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून व त्यांना सदर पुलाचे बांधकाम मंजुरीचे जिल्हाधिकारी सो यांचे सहीचे प्रशासकीय मान्यता पत्र देऊन मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करून उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. [ads id="ads2"]
यावेळी सा. बा. विभागाचे अधिकारी योगेश इंगळे, सरपंच मुबारक तडवी सर, उपसरपंच मुकेश पाटील ग्रा. प. सदस्य प्रदीप सपकाळे, चांगो भालेराव, माजी सरपंच अय्युब बशीर तडवी, माजी उपसरपंच निवृत्ती महाजन, दिलीप जावळे, विष्णू महाजन, पुंडलिक धनगर, योगेश विकास पाटील, जुम्मा हेतु तडवी, संजय तडवी, खुदाबक्ष तडवी सर, अक्तर अमीर तडवी, उपस्थित होते



