सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचना व आदेशाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करणेसाठी एकीकडे संबंधित स्थानिक प्रशासन विविध उपक्रमद्वारे मतदान जनजागृतीसाठी तारेवरची कसरत करित असताना दिसून आले.पंरतू यादरम्यान दुसरीकडे ज्या अनेक(बीएलओ)कडे मतदार माहिती चिठ्ठ्या एरिया वाईज वाटप करण्याचे काम सोपविण्यात आले होते.त्या पैकी काही बीएलओ यांनी ही जबाबदारी पुर्णपणे पारपाडली नसल्याची धक्कादायक बाब रावेर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सावदा नगरपालिका हद्दी मधील वार्ड क्रं.३ व ४ सह शहरात इतर ठिकाणी मतदानाला सरासरी ३६ तास उरले असून,तरी देखील सदरील मतदार माहिती चिठ्ठ्या अनेक मतदारांपर्यंत संबंधित बीएलओ कडून अद्यापही पोहोचविण्यात आलेल्या नाही.यामुळे सदरील चिठ्ठ्या पासून वंचित मतदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. [ads id="ads1"]
तरी सावदा शहरात मतदान जन जागृतीसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नियमानुसार मुख्याधिकारी भुषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे यशस्वी उपक्रम राबविले गेले.पंरतू अशा काही कामचुकार बीएलओ मुळे अनेक मतदारांमध्ये मतदान करण्याचा उत्साह ऐैवजी उदासीनता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तरी अजिबात असे होता कामा नये म्हणून ही गंभीर बाब आज दि.११ मे रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक वार्ताहर तथा जागृत नागरिक फरीद शेख, युसूफ शाह यांनी पालिकेत जावून मुख्याधिकारी भुषण वर्मा यांच्या निदर्शनास आणून दिली.असता सदरील प्रकाराची माहिती मला आधीच मिळाली असून,याबाबत मी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना कळविले आहे.असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.[ads id="ads2"]
तरी यानंतर सदरच्या गंभीर प्रकाराची माहिती या वार्ताहर तथा एक जागृत नागरिकांनी मुक्ताईनगर मतदारसंघाचे संबंधित निवडणूक अधिकारी यांना सुद्धा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधुन दिली आहे.पंरतू याबाबत कोणतीच एक हालचाल होताना दिसून आली नाही.
तरी याची स्वत: जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन दि.१२ मे रोजी संबंधित बीएलओ यांना मतदार माहिती चिठ्ठ्याचे वाटप करणे बाबत आदेश द्यावे.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


