रोटाव्हेटरमध्ये अडकून रावेर तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

चिनावल ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ट्रॅक्टरला रोटाव्हीटर जोडत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने यशवंत हेमचंद्र धांडे (वय ५७, रा. चिनावल) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. १२ मे रोजी चिनावल (Chinawal Taluka Raver) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.[ads id="ads1"]  

रावेर तालुक्यातील चिनावल (Chinawal Taluka Raver) गावातील यशवंत धांडे हे शेतकरी असून ते शेतात आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टरला रोटाव्हिटरची जोडणी करीत होते. यावेळी धांडे यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले. [ads id="ads3"]  

  ही घटना शेतातील इतरांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ गावातील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे चिनावल (Chinawal Taluka Raver)व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!