हतनूर पाटाच्या अनेक उपचाऱ्या उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता यांच्या निष्क्रियतेमुळे झाल्या गायब : जळगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) जळगाव पाटबंधारे विभागाअंतर्गत हतनुर धरणाचा   पाट रावेर, यावल, चोपडा तालुक्यातून गेला आहे या पाटावरून पाटाच्या दोन्ही आजूबाजूस शेती शिवारात केलेल्या उपचाऱ्या मात्र संबंधित उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता यांच्या निष्क्रियतेमुळे आणि जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता यांच्या दुर्लक्षपणामुळे आणि या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी न दिल्यामुळे पाटाच्या उपचाऱ्या अनेक ठिकाणी गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]  

      याबाबत सविस्तर माहिती अशी की हतनूर धरणाचा पाट रावेर,यावल,चोपडा तालुक्यातून गेला आहे शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादनासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जागोजागी या पाटाच्या दोन्ही बाजूंनी पाटावरून शेती शिवारात उपचाऱ्या करण्यात आल्या होत्या आणि आजही अनेक ठिकाणी उपचाऱ्या आहेत यातील अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आपल्या मालकीच्या ट्यूबवेल केल्याने त्यांना आपल्या शेतात असलेल्या उपचाऱ्याची,पाणी पुरवठा मिळण्याची आवश्यकता राहिली नसल्याने त्या काही शेतकऱ्यांनी हतनुर पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता शेतातील पाटचाऱ्या नष्ट करून आपल्या शेतीची मशागत सुरू केली आहे याकडे मात्र संबंधित उपविभागीय अभियंता आणि त्यांचे शाखा अभियंता यांची जाणीवपूर्वक निष्क्रियता उघड झाल्याने तसेच जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आणि इतर संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी हतनुर धरण पाट कार्यक्षेत्रात वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी न देता कागदोपत्री व आपल्या सोयीनुसार कामकाज दाखविल्याने आणि आता पुढे भविष्यात वेळ पडल्यास शेतकऱ्यांना पाटा तून पाटचारी आभावी पाणीपुरवठा होणार नसल्याने पर्यायी आपल्या शेती पिकांना पाणी मिळणार नसल्याने तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads2"]  

        जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांनी हतनुर धरण कार्यक्षेत्रात हतनुर धरणावर आणि पाटावर तसेच पाटासंदर्भात परिसरात काय काय विकास कामे केली किंवा नाही.? पाटाची साफसफाई केली आहे किंवा नाही..? पाटातील केर कचरा, झाडे झुडपे तोडली किंवा नाही..? हतनुर धरण पाट क्षेत्रात विविध कामांवर किती खर्च झाला..? झालेल्या कामाची बिले केव्हा काढली..? संबंधित उपविभागीय अधिकारी,शाखा अभियंता यांचे मुख्यालय ठिकाण नेमके कुठे आणि ते प्रत्यक्षात कुठे राहतात..? आणि संबंधित अधिकारी, शाखा अभियंता शेतकऱ्यांना कुठे आणि कोणत्या कार्यालयात कोणत्या वेळेला विविध कामासाठी कोणत्या दिवशी आढळून येतात..? इत्यादी कामकाजाची प्रत्यक्ष खात्री आणि चौकशी केल्यास फार मोठा भोंगळ कारभार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील हतनूर धरण पाटाच्या आजूबाजूस असलेल्या शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!