सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- येथील बस स्थानकावर पोलीस चौकीच्या मागे असलेली महावीर मिक्स आईस्क्रीम या नावाची दुकान असून येथे विविध प्रकारचे आईस्क्रीम,लस्सी,कोन,कुल्फ्या,व इतर कोल्ड्रिंक्स अशा ठंडगार वस्तूंची उन्हाळ्याच्या दिवसात दरोज मोठ्या प्रमाणात रात्री उशिरापर्यंत विक्री होते.[ads id="ads1"]
परंतू सदरील दुकानाच्या तुलनेत सावदा सावदा बस स्थानकावर रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते मिक्स आईस्क्रीमची दुकान! रात्री दाहाच्या नंतर या वस्तूंची जास्त भावाने विक्री ? अनेक आस्थापने रात्री लवकरच बंद होतात तर काही आस्थापने ही गस्तीवर निघालेली पोलिस जीपच्या(सायरन)आयकून साडे दहा वाजता बंद होताना दिसून येते.मात्र सावदा बस स्थानकावरील व पोलीस चौकीच्या मागे असलेली महावीर मिक्स आईस्क्रीमची दुकान आदर्श आचारसंहितेचे विशेष दिवस असो की, नसो थेट कायदा व पोलिसांचे कोणतेही धाक न बाळगता ३६५ दिवस दररोज रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते,सदर दुकानाचा शटर अर्धा टाकून व दर्शनी भागाचे लाईट रात्री १०-३० वाजता बंद करून महावीर मिक्स आईस्क्रीमची दुकान अशा प्रकारे नामी शक्कल लढवून रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवली जाते.[ads id="ads2"]
यानंतर येथे सदरील वस्तू दाह ते पंधरा रुपये जास्त दराने ग्राहिकांना विकली जाते.तरी अशा रीतीने दुकान चालक ग्राहकांची आर्थिक लूट करित असून,मोठी कामाई करतो,अशी ओरड ग्राहिक करित असल्याचेही बोलले जात आहे.तरी कायद्याने ठरवून दिलेल्या वेळेत ही दुकान का बंद होत नाही?तसेच सदरचा प्रकार दररोज रात्री गस्त घालणारे पोलिस दादांच्या नजरेत येत नाही का?या दुकानात साफसफाई सह वेटर गीरचे काम अल्पवयीन मुलांच्या कडून घेतले जाते.तरी याकडे संबंधित यंत्रणांकडून लक्ष देण्याची अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.