विधवा,वृद्ध महिला २ बालक असे एकूण ४ जण बेपत्ता : यावल पो.स्टे.ला हरवल्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील ) नगरपालिकेजवळ शिवाजीनगर भागातील किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील वृद्ध महिला १ , विधवा महिला १  आणि ७ वर्षीय  १ बालक, ४ वर्षीय मुलगी असे एकूण ४ जण बेपत्ता झाल्याची हरविल्याची नोंद यावल पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याने संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ झाली आहे हे चार जण बेपत्ता नेमके कोणत्या कारणामुळे झाली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"] 

       यावल नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान ४ ही जण घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर गेले होते.आणि मागील ४ दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून न आल्याने अखेर यावल पोलीस स्टेशनला त्यांची हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील ४ जण बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"] 

      यावल शहरातील शिवाजी नगर किल्ल्या जवळ वस्ती आहे. या वस्तीतील रहिवाशी संगीता दिलीप सोनार (वय ४८) ही वृद्ध महिला आपली विधवा मुलगी मीनाक्षी उर्फ पूजा मुकेश सोनार (वय २६), गणेश मुकेश सोनार (वय ७) व पियू मुकेश सोनार (वय ४) हे चौघे जण मागच्या महिन्यात मेहुणे मुकेश अशोक सोनार यांचे किडनीच्या आजाराने दुदैवी निधन झाले असल्याने विधवा झालेली बहीण मिनाक्षी सोनार हे शिवाजीनगर मधील तिच्या भाऊकडे रहात होते.मिनाक्षी सोनार व तिच्या २ लहान बाळसह चार जण हे ९ मे २०२४ रोजी आपल्या घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर गेले असता बेपत्ता झाले आहेत.कुटुंबातील व परिसरातील नागरीकांनी या चौघांचा सर्वत्र शोध घेतला व नातेवाईकांकडे तपास केला. मात्र,चौघे जण कुठेच आढळून न आल्याने अखेर यावल पोलीस ठाण्यात हरवलेल्या विधवा मिनाक्षी सोनार हीचा भाऊ गणेश दिलीप सोनार यांने दिलेल्या खबरी वरून यावल पोस्टेला हरवल्याची  नोंद करण्यात आली.दरम्यान शहरातुन विधवा महिलेसह एकाच कुटुंबातील ४ जण बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी  खळबळ उडाली असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या चौघांचा शोध हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!