यावल ( सुरेश पाटील )
यावल नगरपरिषद मधील अशिक्षित असलेला मुकादम दिलीप मोहन बारसे याने यावल नपाचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक नितेश चांगरे यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली असली तरी यावल नगरपरिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील हे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांची शुद्ध दिशाभूल करीत आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून सोयीनुसार निर्णय घेत असल्याने नगरपरिषद मधील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की १५ मे २०२४ रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की, आपल्या यावल नगरपरिषद मधील प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. दि.१५ मे २०२४ बुधवार रोजी दिलीप मोहन बारसे यांनी मला शिवीगाळ करून व धमकी दिली आहे.तसेच दिलीप मोहन बारसे यांनी यापुर्वी सुध्दादि.२९ जानेवारी २०२४ रोजी सुध्दा नगरपरिषद कार्यालया बाहेर शिवीगाळ केली आहे.व त्याबाबतची तक्रार मी दाखल केलेली आहे.तरी सदर कर्मचारी मला नेहमी शिवीगाळ करतो व धमकी देतो.तुला पाहतो तुला खुर्चीवर बसु देणार नाही.तुला काम करू देणार नाही.तु कसे काम करतो तुला पाहतो,तसेच इतर कर्मचारी यांना माझ्याविषयी भडकावूनवादविवाद करायला लावतो. तसेच कार्यालयीन महत्त्वाची माहिती इतर लोकांना देतो.[ads id="ads2"]
तसेच दिलीप बारसे हे जाणून बुजुन माझ्या कामामध्ये अडथळे आणत आहे.तसेच सदर कर्मचारी हा अशिक्षीत असून यांची मुकादम पदी नेमणुक करण्यात आलेली आहे.तरी सदर कर्मचारी म्हणतो येथे माझीच हुकुमत चालेल,तुला येथे टिकू देणार नाही,तु काही पण कर माझे कोणी काही वाकडे करू शकणार नाही.तरी मला दिलीप बारसे हा वारंवार शिवीगाळ करून बोलतो व मला मानसिक त्रास देत आहे.तरी
यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.व भविष्यात माझे काही एक बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार दिलीप मोहन
बारसे व यांचा मुलगा मोहित दिलीप बारसे राहील असे दिलेल्या तक्रार अर्जात यावल नगरपरिषद प्रभारी स्वच्छता निरीक्षक नितेश चांगरे यांनी म्हटले आहे.
यावल नगरपरिषदेत पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील हे आपल्या मर्जीनुसार,स्वयंनुसार कामे होण्यासाठी आपल्या खास विश्वासातील आणि अशिक्षित असलेल्या दिलीप मोहन बारसे यास मुकादम पदी नियुक्त केले आहे.नियुक्ती करताना सत्यम पाटील यांनी महाराष्ट्र शासन परिपत्रकाची सुद्धा पायमल्ली करून आपल्या पदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग केला आहे, ही माहिती मुख्याधिकारी यांना न सांगता दिशाभूल करून दिलीप बारसे यांची बेकायदा नियुक्ती करून सोयीनुसार कामे करून घेत आहेत याकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आपले लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार मुकादम पदी पात्र असलेल्या व्यक्तीची कर्मचाऱ्याची नियुक्ती तात्काळ करावी आणि तसे न केल्यास यावल नगरपरिषद अभियंतासह मुख्याधिकारी हे सुद्धा पुढील कारवाई जबाबदार राहतील याबाबत त्यांनी नोंद घ्यावी असे संपूर्ण यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह शहरात बोलले जात आहे.
तक्रारीच्या प्रती माहितीस्तव जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी फैजपूर, पोलीस निरीक्षक यावल यांच्याकडे देण्यात आल्या आहे.तरी अशिक्षित असलेल्या मुकादम याच्यावर मुख्याधिकारी काय कारवाई करणार..? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.