सावदा पोलिस स्टेशन फैजपूर पोलीसांच्या कौतुकास्पद कामगिरी चा आदर्श घेणार का ? सपोनि पळेंकडे नागरिकांच्या अपेक्षा?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


फैजपूर पोलीसांनी तपासचक्रे फिरवत लाखाचे मोबाईल केले हस्तगत  

सावदा प्रतिनिधी/मुबारक तडवी 

फैजपुर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी चोरीस गेलेले १२ मोबाईल हस्तगत करत१ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना केला परत सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि जालिंदर पळे या कारवाईचा आदर्श घेतील का ?    सावदा पोलिस स्टेशन तक्रार नोंद डायरीत नोंद असलेल्या सावदा शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील विविध घरफोडीच्या घटना जबरी चोर्यांचा सत्र सुरूच आहे चिनावल येथील सेंट्रल बँक दरोडा प्रकरणाचा तपास अजूनही थंडबस्त्यातच आहे ? खिरोदा येथे दोन वेळेस बॅकेचे एटीएम फोडून चोरटे फरार झाले होते सदर घटनेचा अद्यापही तपास लागलेला नाही?अद्यापही तपासाची चक्रे फिरली नाही ? मात्र  अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील  फैजपुर पोलीस स्टेशन हद्धीत चालु वर्षी आज पावेतो बरेच मोबाईल गहाळ व चोरीस गेले बाबत संबंधीत मोबाईल धारक यांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या.[ads id="ads1"] 

   जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी,  अशोक नखाते, अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव,श्रीमती अन्नपुर्णा सिंह, सहा. पोलीस अधिक्षक फैजपुर उप विभाग यांनी वेळोवेळी मासीक क्राईम मिटींग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करणेबाबत दिलेल्या सुचनांवरुन मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहीतीच्या आधारे तांत्रीक विष्लेशन करुन सायबर शाखा व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची मदत घेवून फैजपुर पोलीसांनी एकुण १२ मोबाईल अंदाजे १ लाख रुपये किमतीचे हस्तगत करुन ते मुळ मोबाईल धारकास आज दि.९/५/२०२४ रोजी मा. श्रीमती अन्नपुर्णा सिंह, सहा. पोलीस अधिक्षक फैजपुर उप विभाग यांचे हस्ते परत करण्यात आलेले आहेत.[ads id="ads2"] 

सदरची कामगीरी मा.डॉ. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक, जळगांव, मा. श्री अशोक नखाते, अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव, मा. श्रीमती अन्नपुर्णा सिंह, सहा. पोलीस अधिक्षक फैजपुर उप विभाग यांच्या मार्गदर्शनावरुन फैजपुर पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश वाघ, पो. उप निरी. विनोद गाभणे, पोहेकॉ.  गुलबक्ष तडवी, मपोहेकॉ. मदीना तडवी, मपोहेकों  हर्षा चौधरी, पो.कॉ.  शारदा देवगिरे, पोकॉ.  जुबेर शेख यांनी तसेच वाचक शाखेचे पोकों गौरव पाटील व स्थागुशाचे पोना. ईश्वर पाटील यांनी केली 

फैजपूर पोलीस स्टेशन चे सपोनि निलेश वाघ व कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी चे सर्वत्र कौतुक केले जात आहे मात्र सावदा पोलिस स्टेशन हद्दीत दैनंदिन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दररोज नवीन चोरीची घटना घडत आहेत मात्र फैजपुर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी चा आदर्श घेऊन सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे हे घेतीलकाय?व झालेल्या चोर्या चा शोध घेत छडा लावण्यासाठी प्रयत्न करतील का?अशी आर्त अपेक्षा चोरी झाल्याची तक्रारदार यांचेकडून होते आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!