सिद्धार्थ नगर,रावेर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.२४. रावेर येथील सिद्धार्थ नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे मा. तालुका अध्यक्ष यांच्या निवासस्थानी शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती दि.23,5,2024. शुक्रवार रोजी सायंकाळी 6. वाजेला साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]  

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मा तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जो धम्म आहे हा वैज्ञानिक आधारावरती असून यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही भगवान बुद्धांनी जो या देशाला बौद्ध धम्म दिला तो या जगातील सर्वश्रेष्ठ असा धम्म आहे जगातील 43 राष्ट्रांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार असून त्या ठिकाणी बौद्ध धम्माचा नियमांचे पालन केले जाते. परंतु भारत देशामध्ये बौद्ध धम्माचा उगम झाल्यामुळे भारत देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कमी प्रमाणात आहे असे ते म्हणाले. [ads id="ads2"]  

यावेळी ज्योती शिरतुरे, हेमलता शिरतुरे, शोभा शिरतुरे, सुनीता शिरतुरे ,करुणा शिरतुरे, अंतरा शिरतुरे ,रूपाली शिरतुरे, स्नेहाली शिरतुरे, दीक्षा शिरतुरे, काजल   शिरतुरे , सुभाष शिरतुरे , प्रथमेश शिरतुरे, देविदास शिरतुरे, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघरत्न शिरतुरे यांनी केले तर आभार बुद्धरत्न शिरतुरे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!