यावल ( सुरेश पाटील )
आपल्या महाराष्ट्रातील पहाडपट्टीत राहणारा आदिवासी बांधव हा राजकारणापासून समाजापासून बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित असलेला समाज आहे त्या समाजा पर्यंत परिपूर्ण असे शिक्षण आरोग्य अजून पर्यंत पोहोचू शकले नाही.[ads id="ads1"]
त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचण्याचा मानस ठेवून हिंदू जनजागृती न्यासा तर्फे कपडे, वाटप,खाऊवाटप,आदिवासीं च्या गरजेच्या वस्तू वाटप करणे तसेच रक्त तपासणी करणे, आरोग्य तपासणी करणे असे विविध उपक्रम महाराष्ट्र भर घेण्यात येतात याचाच एक भाग म्हणून हिंदू जनजागृती न्यास जळगाव तर्फे अक्षय तृतीयेनिमित्त यावल तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरदे येथे आदिवासी पाड्यात आदिवासी बांधवांना व त्यांच्या मुला मुलींना खाऊ वाटप हिंदू जनजागृती न्यासाच्या सौ. छाया भोळे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्याचे ग्रामपंचायत डोंगर कठोरा येथील सरपंच यांनी प्रमाणपत्र देऊन केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे आणि शब्द दिला आहे की यापुढे न्यासाला जर काही मदत लागली तर नक्की मदत करू पाड्यावरील सर्वांनाच खाऊवाटप करण्यात आला.



.jpg)