रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे,"दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,रावेर तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने बौध्दाचार्य श्रामणेर शिबिर भरवून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सामाजिक परिस्थिती व व्यवस्था परिवर्तन घडवून बौद्ध धम्म आणि येणारी भावी पिढी वैचारिक,व सुसंस्कृत घडावी हा व्यापक दूर,दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहे.[ads id="ads1"]
आणि त्यांचा उत्साह अधिक वृद्धिंगत व्हावा , आणि सामाजिक ऋणाची जाणिव ठेवून आपण सुद्धा आपल्या समाजाचं नेतृत्व करणारे घटक आहोत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाचा पाया अधिक मजबूत व्हावा.[ads id="ads2"]
या अनुषंगाने सामाजिक समता मंच, च्या वतीने दिनांक २६ में रविवार रोजी सायंकाळी ठिक ६:०० वाजता स्टेशन रोड, बुद्धनगरी ,रावेर येथे राष्ट्रिय समाज प्रबोधन कार सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनीअर. उदयपाल महाराज वणीकर यांचे समाज प्रबोधन पर जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यासाठी रावेर तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकत्यांनी व बौद्ध उपासक व उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने सफेद वस्त्र परिधान करून कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करणेत येत आहे.



