रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : - येथिल तक्षशिला बुद्ध विहारात विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची पुष्पपूजा, धूपपूजा व दीपपूजा पूज्य भन्ते दीपनकर महाथेरो यांचे हस्ते करण्यात आली. [ads id="ads1"]
यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकाळे, जिल्हा संघटक तथा केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल यांनी उपस्थित समाज बांधवांना त्रिशरण पंचशील देऊन भीम स्मरण व भीम स्तुती घेतले. यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे, माजी उपनगराध्यक्षा रंजना गजरे, माजी नगरसेवक जगदीश घेटे, ऍड. योगेश गजरे, काँग्रेस प्रदेश सचिव राजू सवर्णे, [ads id="ads2"]
प्रदेश उपाध्यक्ष रा. कॉ. पंकज वाघ, वंचित बहुजन आघाडीचे बाळू शिरतुरे, पीपल्स बँकेचे माजी व्यवस्थापक प्रकाश महाले, सामाजिक समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे, ऍड. सुभाष धुंदले, वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष राहुल डी गाढे,सरपंच संजय मशाने, बसपाचे प्रदीप सपकाळे, महेंद्र लोंढे,विशाल गजरे आदींनी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प वाहून अभिवादन केले. यानंतर श्रमाणेर संघाने मंगलमैत्री केली. कार्यक्रमासाठी वामन तायडे, पुंडलिक कोंघे, किरण तायडे, रघुनाथ कोंघे,चांगो भालेराव, अनिल घेटे, सम्यक इंगळे,डॉ. राजेश्वरी गजरे, चंद्रप्रभा गजरे, छाया मेढे, उषा गजरे, सुमन कोंघे, प्रमिला लोंढे, निर्मला तायडे यांचेसह शेकडो उपासक आणि उपासिका उपस्थित होते.



