यावल ( सुरेश पाटील ) रावेर लोकसभा मतदार संघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात केळी,कपाशी व इतर शेती उत्पादित मालाला मातीमोल भाव मिळत असल्याने तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ९०% लोकप्रतिनिधी मुग गिळून आपले राजकारण करीत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जावून त्यांचे आर्थिक नियोजन शून्य झाले आहे,पर्यायी शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे त्यामुळे सुज्ञ शेतकरी आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपला रोष व संताप व्यक्त करणार असल्याने नेमका फटका आणि फायदा कोणाला बसणार..? हे लोकसभा निवडणूक निकालानंतर लोकप्रतिनिधींना शासनकर्त्यांना समजणार आहे असे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात बोलले जात असल्याने कापसाला,केळी पिकाला,कांद्याला व शेती उत्पादित इतर मालाला योग्य भाव तात्काळ जाहीर करायला पाहिजे अशी मागणी भारतीय जनसंसद जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली आहे.[ads id="ads1"]
अनेक शेतकरी नापिकी व शेती उत्पादित मालाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे केळी,कापसाला, सोयाबीनला कांद्याला तुरी,हरभरा व अन्य इतर सर्व मालाला भाव द्या ! अशी मागणी भारतीय जनसंसद तर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्या सह देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.या रणधुमाळीत शासनकर्त्याचे लोकप्रतिनिधींची ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांकडे पुर्णता दुर्लक्ष झाले.यावरुन शेतकऱ्यांचा कोणी वाली राहिला नाही ! शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे.आणि सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात दंग झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.केळी,कापुस, सोयाबीन,तुर, कांदा हरभरा पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोडमोडले आहे.तेव्हा राज्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी नेत्यांनी सजग होऊन शेतकऱ्यांचे केळी,कापसाला सोयाबीनला भाव वाढवून घ्यावे अशी महत्वपूर्ण मागणी भारतीय जनसंसदचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.१० वर्षांपूर्वी जो भाव होता तोच भाव आज सुध्दा मिळत आहे.केळीला मातीमोल भाव मिळत आहे याबाबत आज एकही लोकप्रतिनिधी बोलत नसून मुग गिळून प्रचार करीत आहेत यासह तालुक्यातील अनेक गंभीर समस्या आहेत याबाबत कोणीही आवाज काढायला तयार नाही म्हणजेच विरोधक आणि सत्ताधारी हे फक्त आपल्या राजकारणात व्यस्त असून जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आपला हेतू साध्य करून घेत आहेत दुसरी बाजू लक्षात घेतली असता शेतकरी उत्पादनावरील सर्वच खर्च मोठ्या प्रमाणात महागला आहे. दरवर्षी शेतकरी नैसर्गिक आपत्तीत संकटात येत आहे. याही वर्षी शेतकरी नगदी पीक म्हणून केळी,कापूस,सोयाबीन मोठ्या प्रमाणात पेरणी केली.[ads id="ads2"]
मात्र कधी अवकाळी पाऊस तर कधी वादळी अतिवृष्टीमुळे शेतकरी खचला आहे.यावरुनच केळी व कापसाचे उत्पादन कमी जास्त होऊन वेळेवर मातीमोल भाव मिळत आहे शेती शिवारातील चोरीच्या व नुकसानकारक घटना वेगळ्या आता तर काही वन्य प्राण्यांमुळे शेती कशी करावी याबाबत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.या सर्व परिस्थितीवर मात करून पिकांचे जीवापाड रक्षण करुन पिकविलेल्या शेतमालाला ( यावल तालुक्यात ) इतर काही ठिकाण वगळता कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल लिलाव पद्धतीने खरेदी केला जात नसल्याने व्यापारी आपल्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊन धान्य खरेदी करीत आहे, त्यामुळे शासनही शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असेल तर शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता काय करावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांचे समोर उभा आहे. राजकीय पक्ष नेते लक्ष देत नाहीत शासन करते मुजोर झाली आहे.निवडणुकी पुरते फक्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन त्यांना निवडणुकीत भूल भुलैया किंवा दिशा बोल केली जात आहे. तरी ही शेतकरी आजही भाववाढीच्या आशेवरच जिवन जगत असुन आज रोजी आपले केळी,सोयाबीन,कापुस शेतकऱ्यांचे घरामध्ये भाव ठेवून भाव वाढीची वाट बघत आहे.तरी राजकीय नेत्यांनी,राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचे आर्थिक हितासाठी मतदाराची मते मागतानाच ठोस आश्वासने देऊन व न्याय मिळवून देण्यासाठी शासन कर्त्यानी त्वरित शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी भारतीय जनसंसदचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.तसेच पर्यायी याचे परिणाम लोकप्रतिनिधीना निवडणूक निकालानंतर लक्षात येणारच आहे असे राजकीय चित्र आज निर्माण झाले आहे.