स्वामी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे रावेर येथे उद्घाटन : स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग नोंदविला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर  येथे छत्रपती शिवाजी  महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वामी स्पोर्ट्स क्लब रावेर यांच्यावतीने आयोजित स्वामी प्रीमियर लीग स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले.

 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे 9 मे पर्यंत 19 सामने एकमेकांसोबत  साखळी पद्धतीने खेळतील. या स्पर्धेचे  ऍड सुरज चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ठेकेदार राजेंद्र चौधरी  हे होते.  दीप प्रज्वलन शिरीष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहूणे म्हणून दिलीप सुंदराणी ,जेष्ठ पत्रकार दीपक  नगरे,  नितीन महाजन, राजेंद्र भागवत जैस्वाल, मुकेश चंदनानी, विजय  गोटीवाले, अंकित चंदनानी, दिपक पांडे,गणेश धांडे, राजू पवार भैय्या पाटील आदी उपस्थित होते.[ads id="ads1"]  

सूत्रसंचालन रुपेश पाटील  यांनी केले तर आभार जीवन महाजन  यांनी मानले.  .खालील आठ संघ व त्यांचे संघमालक शायनिंग के स्टार संजय चौधरी, डाहाके वॉरियर्स मयूर डहाके, आईबाबा सोलर क चॅम्पियन नरेंद्र महाजन, मोरया बॅटर्स रवी महाजन, किंग ऑफ स्वामी ट्रेडर्स ललित महाजन, छावा टायगर हर्षल महाजन, सी.एम.सी.रायडर्स वैभव देशमुख, परफेक्ट पॅंथर  शाम तायडे, स्पर्धेदरम्यान ह्या सर्व संघांचा सहभाग असणार आहे तर आजचा नाणेफेक विजय वसंतराव गोटीवाले यांच्या हस्ते करण्यात आला पहिली  क्रिकेट मॅच शायनिंग के स्टार वर्सेस किंग्स ऑफ स्वामी ट्रेडर्स यांच्यात झाला असून नाणेफेकीचा कौल किंग्स ऑफ स्वामी जिंकला यांनी प्रथम फलंदाजी करत 8 ओव्हर मध्ये 112 धावा तर शायनिंग के स्टार मधील पूर्वेस चौधरी यांनी 48 धावा करत शायनिंग के स्टार या संघाला विजय मिळवून दिला.[ads id="ads2"]  

  दुसरा सामना छावा टायगर्स विरुद्ध परफेक्ट पॅंथर यांच्यात झाला यात परफेक्ट पॅंथर यांनी सामना जिंकला तर बक्षीस वितरण पुष्पक पवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी विष्णू चरण अमरसिंगे भाग्येश कासार संदीप महाजन, कौशल पटेल, मयूर डहाके ,महेश चौधरी,भावेश महाजन, स्वामी क्लब यांनी परिश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!