गिरडगावात मोठी आग :अग्निशमन बंब वेळेवर आल्याने पुढील अप्रिय घटना टळली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील )

तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गिरडगाव येथे गावठाण मधील डीपी क्र.७ वर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आज रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली, गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक पाटील यांनी तात्काळ यावल पोलिसांची संपर्क साधून यावल नगरपालिकेचा अग्निशामक बंब तात्काळ बोलावून आग आटोक्यात आणली.[ads id="ads1"]    

   यावेळी यावल पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल मराठे व पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी यांनीही घटनास्थळी तात्काळ भेट दिली व आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य व प्रयत्न केले,एमएसईबी स्टॉप तात्काळ घटनास्थळावर आला व त्यांनी बीज प्रवाह बंद करून आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले पोलीस पाटील अशोक पाटील यांची समय सुचकता व त्यांनी पोलिसांना केलेले तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क आणि अग्निशामक बंब यावल नगरपालिकेच्या बोलून विझवली,आग तत्परता व समाज सुचकता बाळगून आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने गावात व परिसरात पोलीस पाटील अशोक पाटील यांचे कौतुक होत आहे.[ads id="ads2"]  

  यावल नगरपरिषदेचे फायरमन कल्पेश बारी व अग्निशामक बंब ड्रायव्हर शिवाजी पवार यांचेही कौतुक होत आहे वेळेवर अग्निशमन बंब आला नसता तर लागलेली आग शेत-शिवारापर्यंत पोचली असती बाजूला शेतामध्ये मका चाऱ्याचां गुड लावलेला होता तो जळून खाक झाला असता मात्र अग्निशामक बंब वेळेवर आल्यामुळे चारा वाचला हे विशेष.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!