मोठा वाघोद्यातील गेस्ट्रो सदृश आजाराचे ५ रुग्णांची वाढ तर चिनावल आरोग्य केंद्रातून १२ रुग्णांना डिस्चार्ज

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


   ग्राम पंचायतने गावात दवंडीद्वारे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवाहन 

 मोठा वाघोदा प्रतिनिधी(मुबारक तडवी) 

मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रो संक्रमित रुग्ण आढळलेल्या परिसराची काल सीईओसह २५  अधिकार्यानी  पाहणी करुन साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सुचना केल्या होत्या तर आज मोठा वाघोद्यात ग्रामपंचायतीतर्फे गटारी स्वच्छ करण्यात आल्या जमिनीलगतचे नळ कनेक्शन  जमिनीपासून २ फुट उंच वर काढणेत आले पाण्याच्या जलकुंभातून संसर्ग जन्य परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला व 3 टैंकर द्वारे  शुध्द पाणी शुद्धीकरण करून पिण्याचे पाणी बाधित भागात पुरवठा केला  आहे.[ads id="ads1"]  

तसेच दवंडी देऊन आरोग्याची काळजी घेणे बाबत जनजागृती करणेत आली.आज सकाळ पासुनच ग्रामपंचायत यंत्रणा कामाला लागली होती. मोठा 

वाघोदा येथे पाणीपुरवठा हा बलवाडीच्या बैकवाटर  येथुन होतो. आज तेथील पाणी तपासणी नमुने घेण्यात आले   पाईप लाईन  कुठे लिकेज आहे हे ही आज तपासण्यात आलेदसनूरला तीन ठिकाणी लिकेज असल्याचे समजले त्यातील दोन ठिकाणी लिकेज नाही उर्वरीत तपासणी उद्या केली जाणार आहे.बसस्टैड परीसरातील सन 1970 पासुन गावाला पाणी देत असलेल्या जुन्या जलकुंभाचे कनेक्शन हे आज बंद करण्यात आले.[ads id="ads2"]  

  व गावाचा पाणी पुरवठा हा नवीन जलकुंभावरुन देण्यात येईल आज दिवसभर ग्रामपंचायत तर्फे लिकेज शोधून काढले व दुरुस्ती काम सुरु होते.हे जलकुंभ भरपूर दिवसांपासुन जीर्ण झाल्याने लवकरच याला या चार पाच दिवसात पाडले जाणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी  सुनील गोसावी यांनी सांगितले.खाली रहदारी परिसर व महावितरण विद्युत मंडलाचे कार्यालय असल्याने तो जलकुंभ ढासलण्याची भीती आहे तशी सुचना ही संबंधित व ग्रामस्थांना देण्यात आली आहे.

उपरोक्त गॅस्ट्रो रुग्ण संख्या३०  चिनावल पीएचसीत दाखल नुसार आहे खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती असलेले रुग्णांची आकडेवारी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे कड प्राप्त नाही?

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!