रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : यावल वन विभागातर्फे बुद्ध पौर्णिमा निमित्त दि . २३ मे च्या रात्री राबविण्यात आलेल्या "निसर्ग अनुभव" पशू प्रगणना मोहिमेत बिबट्या, अस्वल, हरीण आणि इतर प्राण्यांचे दर्शन झाले. यावल वन विभागातर्फे ही मोहीम राबवली गेली. [ads id="ads1"]
जमीर एम. शेख IFS (भा. व. से.) उप वनसंरक्षक यांच्या मार्गर्शनाखाली सुनिल भिलावे RFO (क्षेत्र वन अधिकारी) , आणि अन्य वन अधिकारी व कर्मचारी विपुल पाटील, विजय बोराडे, हनुमंत सोनवणे, चेतन शेलार, अशरफ तडवी, सरला भोंगरे, रविकांत नगराळे, सुधीर पटने यांनी अतिशय मेहनत घेऊन ही मोहीम यशस्वी केली. [ads id="ads2"]
वन विभागातर्फे आयोजित या मोहिमेत विवरे येथील आनंद मोरे, राहूल पूनतकर, गणेश इंगळे आणि जितेंद्र पाटील तसेच धुळे येथील वन्य जीव प्रेमी वरद पाटील, शुभम घुले व श्रेयश सुतार , विजय तोशिवल, केतन, स्मितेश , मनोज यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.
पालच्या जंगलात घडले बिबट्याचे दर्शन(चित्त थरारक व्हिडिओ पहा)




