https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

शहिद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय कांबळे यांचे दुःखद निधन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


अहमदपूर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्ष लढ्यातील पहिले शहिद नामांतर विर शहिद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंड्यामाय पोचिराम कांबळे यांचे आज  दि. 21 मे 2024 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1.30 वाजता सिडको - नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.[ads id="ads1"]  

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघर्ष लढ्यात आपला पती वीर पोचिराम कांबळे यांना आत्मिक बळ देण्याचे खूप मोठे सामाजिक काम यांनी केले. त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना मायेचा आशीर्वाद देऊन रात्री बेरात्री  जेवणाची, आराम करण्याची व्यवस्था केली. कार्यकर्त्यांना मातेप्रमाणे वागणूक दिली. अशा या वीर मातेने आज दिनांक 21 मे 2024 रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!