चिनावल विद्यालयाची यशाची परंपरा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने ठेवली कायम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : 

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा 99.31 टक्के, कला शाखेचा 94.11% टक्के तर एच एस सी व्होकेशनल शाखेचा 90 टक्के निकाल लागला.विज्ञान शाखेत  विद्यालयातून  सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे यांचा मुलगा अथर्व जालिंदर पळे हा विद्यार्थी 92 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यसह प्रथम आला.[ads id="ads1"]  

  तसेच हेमंत योगेश बोरोले हा 88.17 टक्के गुण मिळवून द्वितीय तर डिगेश्वरी जगदीश भंगाळे ही विद्यार्थिनी 87.17% गुण मिळवून तृतीय आली. कला शाखेत निलम गणेश भालेराव ही 81.67% गुण मिळवून प्रथम, महक शरीफ तडवी ही 75 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर आफ्रीन सादिक तडवी ही 73.83% गुण मिळवून तृतीय आली.[ads id="ads2"]  

  एच एस सी व्होकेशनल शाखेतून अश्विनी रविंद्र सपकाळे 71.67 टक्के गुण मिळवून प्रथम, मुमताज हुसेन तडवी ही 69.17% गुण मिळवून द्वितीय तर सैनाज रज्जाक तडवी ही 68.67 गुण टक्के मिळवून तृतीय आली. या वर्षी देखील सावदा पोलीस स्टेशन यांच्या मुलाने विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन,चेअरमन विनायक महाजन,सचिव गोपाळ पाटील,शालेय समिती सदस्य मनोहर पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. आर.ठाकरे,उपमुख्याध्यापिका एम.डी.नेमाडे  व पर्यवेक्षक पी. एम.जावळे यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!