यावल ( सुरेश पाटील )
रावेर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेब शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस यावल येथे आज बुधवार दि.२२ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सातोद येथील तथा यावल तालुक्यातील सर्वांना परिचित असलेले शेतकरी तथा व्यापारी धीरज कुरकुरे, चितोडा येथील सरपंच चंदू जंगले,मोहराळा येथील धीरज प्रभाकर पाटील सातोद येथील प्रसन्न महाजन,विकास पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.