रावेर प्रतिनिधी(शकील शेख)
हजला गेल्यानंतर आपल्या जीवनातील नवीन पर्वाला सुरूवात करण्याचे काम हज यात्रा करणाऱ्यांकडून होते, असे प्रतिपादन आमदार पुत्र युवानेते भावी आमदार धनंजय चौधरी यांनी तालुक्यातील कर्जोद येथे केले. आपल्या जीवनात अनेक चुका होतात. आपण माणूस आहोत तर चूक होतातच. मात्र, भविष्यात कुठलीही चुक होणार नाही, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.[ads id="ads1"]
कर्जोद येथे पवित्र अशा हज यात्रे करीता मुस्लिम समुदाय यांचे पावित्र्य स्थान मक्का- मदिना येथे जाणाऱ्या रईस शेख व त्यांची पत्नी जरीना बी शेख यांचा धनंजय चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चौधरी यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.[ads id="ads2"]
यावेळी उद्योजक श्रीराम पाटील,किशोर पाटील,शफी शेख,उद्योजक आशिफ शेख,पत्रकार शकील अब्दुल शेख,हजी सरफराज शेख,अफजल खान, कामील शेख, सऊद शेख, माईल पैलवान,हाफिज मुर्तजा, कारी कासिम,हाफिज वसीम,उर्दू शाळा केंद्र प्रमुख रईस शेख, अल्ताफ शेख,एजाज शेख, शाहीद शेख,तसेच मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.



