रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा ) : कित्येक वर्षांनंतर रावेर पाल रस्त्याने रावेर आय टी आय कॉलेज पासून ते मुंजलवाडी पर्यंत खडीकरण व डांबरीकरण आमदार निधीमधून दोन टप्प्यात दोन मक्तेदारांकडून नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये शिंदखेड गावाचे पुढे ते मुंजलवांडी या रस्त्याचे खडीकरण काम सुरू असताना रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीच्या पदधिकाऱ्यांनी बोगस काम तात्काळ बंद केल्याने सबंधित मक्तेदारावर अर्धा किलोमीटर पसरलेली खडी उचलण्याची नामुष्की ओढवली होती.[ads id="ads1"]
मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना सबंधित मक्तेदाराने या घटनेचा बोध न घेता मनमानी पद्धतीने व बोगस खडीकरण व डांबरीकरण काम केल्याने या रस्त्याला तीनच दिवसात खड्डे पडायला सुरुवात झाली आहे . आज सकाळी रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीच्या पदधिकाऱ्यांनी आय टी आय कॉलेज ते शिंदखेड या रस्त्याने पाहणी केली असता शिंदखेड गावाजवळ असलेल्या पुलाजवळ तीनच दिवस आधी डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला खड्डा पडुन खालची पिवळी माती वर आल्याचे स्पष्ट दिसले.[ads id="ads2"]
त्यामुळे सबंधित मक्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे बद्दल रोष व्यक्त होत आहे. तीनच दिवसांत नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याचे खाली खडीकरण असूनसुद्धा डांबरी रस्त्याला खड्डा पडला याचे कारण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मक्तेदार यांच्यात काही अर्थपूर्ण हित सबंध आहेत काय? याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी व सबंधित मक्तेदारांकडून नव्याने डांबरीकरणं करण्यात यावे तसेच या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येऊन त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये. अन्यथा रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे
यावेळी रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीचे अध्यक्ष योगेश पाटील, प्रदिप सपकाळे, मुकेश पाटील, चांगो भालेराव, अशोक हिवराळे, गोपाळ पाटील शिंदखेड सर्व पदाधिकारी हजर होते.



