सावदा प्रतिनिधी (मुबारक तडवी) - रावेर तालुक्यातील सावदा शहरातील कुंभार समाजाची नुकतीच कार्यकारिणी जाहिर झाली त्या कार्यकारणीमध्ये सावदा कुंभार समाजाचे अध्यक्षपदी रविंद्र हिवरकर यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून गोपाळ हिवरकर यांना निवडण्यात आले.[ads id="ads1"]
दरवर्षी प्रमाणे कुंभार समाजाची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकिच्या अध्यक्षस्थानी अमोल हिवरकर हे होते. या बैठकीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या नंतर सर्वानुमते समाजाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. [ads id="ads2"]
यात सावदा शहर अध्यक्षपदी रविंद्र हिवरकर तर सचिवपदी गोपाळ हिवरकर यांची तसेच कार्यकारणी उपाध्यक्ष मोतीराम हिवरकर, सदस्य-किरण हिवरकर, विनोद हिवरकर, अमोल हिवरकर, सचिन हिवरकर, किशोर हिवरकर, संतोष हिवरकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष रविंद्र हिवरकर यांनी समाजाचे विविध प्रश्न, व समस्या याबाबत सदैव कार्य करु तसेच सावदा शहरात कुंभार समाज मंदिर उभे करण्यासाठी सर्वांना सोबत घेवून प्रयत्न करु असे प्रतिपादन केले. त्यांच्या निवडी बद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.