जे टी महाजन सूतगिरणीवर महसूल आणि नगरपरिषदेचा लाखो रुपयाचा बोजा असताना बेकायदा दस्त नोंदणी करून झाली खरेदी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

खरेदी करणार डॉ.शैलेश खाचणे अडचणीत येणार..?

राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख यांनी केली जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार

यावल दि.२८( सुरेश पाटील ) संपूर्ण राज्यात आणि राजकारणात प्रसिद्धीच्या झोतात असलेली यावल येथील जे टी महाजन सहकारी सूतगिरणीवर लाखो रुपयाच्या शासकीय अधिकृत बोजा असताना यावल दुय्यम निबंधक यांच्याकडे फैजपुर येथील डॉ.शैलेश खाचणे यांनी बेकायदा दस्त नोंदणी करून खरेदी केल्याने तसेच या खरेदी खताची चौकशी होऊन कार्यवाही करण्याची मागणी रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी केल्याने डॉ. खाचणे यांच्यासह संबंधित यंत्रणा अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

       जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे काल दि.२७ जून २०२४ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, यावल येथील जे टी महाजन सहकारी सूतगिरणी यावल यांच्याकडून यावल नगरपरिषदेची कराची रक्कम गेल्या अनेक वर्षापासून थकीत आहे अनेकदा नगर परिषदेने कराची नोटीस देऊन देखील रक्कम वसूल होत नसल्याने व कर रक्कम वाढत असल्याने यावल नगर परिषदेने जे टी महाजन सहकारी सूतगिरणी यावल यांचे मालकीचे मौजे यावल शेत गट नंबर २१३० पैकी २१३१ व २१३२ व इतर क्षेत्रावर दुय्यम निबंधक यावल यांच्याकडून वरील मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर सन २०१५ / १६ सालापर्यंतची कराची रुपये ५३६८०७० / - व भाडेकरारानुसार १४ जून २०१२ ते १४ जून २०१३  बिल रुपये ५१८२१४८ अशी एकूण १०५५०२१८ रकमेचा बोजा बसविला होता आणि आहे आज व्याजासहित ती रक्कम ३ कोटी ५४ लाख ६२ हजार रुपयापर्यंत थकबाकी झाली आहे.[ads id="ads2"] 

       यावल येथील जे टी महाजन सहकारी सूतगिरणी यावल यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून कर्ज घेतले असले कारणाने व ते कर्ज थकीत झाल्याने जिल्हा बँक जळगाव यांनी बोजा बसविला होता कर्जाची रक्कम वाढत गेल्याने व कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा बँकेने जे टी महाजन सहकारी सूतगिरणी कायदेशीर रीतसर ताब्यात घेऊन कालांतराने विक्रीस काढली व ती सूतगिरणी फैजपूर येथील प्रसिद्ध ख्यातनाम डॉ.शैलेश प्रभाकर खाचणे यांनी दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी यावल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करून ५ कोटी ८५ लाख रुपयात खरेदी केली आहे.

       वास्तविक पाहता कोणतीही मालमत्ता खरेदी करीत असताना मालमत्तेचा सातबारा उतारा बोजारहीत म्हणजे बोजा कमी केल्याशिवाय खरेदी खत नोंदविता येत नाही किंवा बोजा असलेल्या संस्थेकडून बँकेकडून ना हरकत एनओसी दाखला प्राप्त करून घेऊन व बोजा असलेल्या थकीत रकमेच्या  ५ टक्के इतकी रक्कम मुद्रांक शुल्क भरणा केल्याशिवाय खरेदी खत नोंदविता येत नाही. वरील खरेदी खताचे अवलोकन केले असता असे कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र नगरपरिषद यावल यांनी दिलेले  नाही परंतु खरेदी खत नोंदविण्यात आलेले आहे, खरेदी खत नोंदविताना जेटी महाजन सहकारी सूतगिरणी यावलच्या सातबारा उताऱ्यावरील यावल नगरपरिषद तहसीलदार यावल तसेच अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्था यावल सहाय्यक विक्रीकर आयुक्त जळगाव यांचा जप्तिबोजा असताना सुद्धा यावल येथील दुय्यम निबंधक यांनी बेकायदा खरेदी खत नोंदवून घेतले आहे का असा प्रश्न उपस्थित होऊन तसेच हे नियम बाह्य बेकायदा आहे व बेकायदेशीर आहे

     यावल येथील जे टी महाजन सहकारी सूतगिरणीच्या मालमत्तेवर म्हणजे सातबारा उताऱ्यावर नफाचा बोजा असताना नियमबाह्यरित्या व बेकायदेशीर खरेदी खत केलेले असल्याने या प्रकरणाची उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी यांच्या मार्फत चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल वसंतराव पाटील यांनी केल्याने आता डॉ. शैलेश खाचणे यांच्यासह संबंधित यंत्रणा अडचणीत येणार आहे किंवा नाही..? याबाबत यावल रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून राहणार आहे.


माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची प्रतिक्रिया - 

      कराची रक्कम वसूल झाल्यास यावल नगरपालिकेमधून निवृत्ती झालेले कर्मचारी, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, सफाई कामगार यांची थकीत असलेली ग्रॅज्युटी, वेतन आयोगाचा फरक, रजा विक्रीची रक्कम देणे सुलभ होणार आहे. व उर्वरित रकमेत विविध विकास कामे देखील करता येणार आहेत . कराची रक्कम वसूल होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याची वाट बघू वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढण्याची आपली तयारी आहे. अतुल वसंतराव पाटील.              

माजी नगराध्यक्ष यावल न. प.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!