माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला होता यावल नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा.
यावल ( सुरेश पाटील ) यावल येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेले घरकुलांचे थकीत हप्ते मार्च २०२४ पासुन लाभार्थ्यांना मिळाले नव्हते.त्यामूळे ते लवकरात लवकर वितरित करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी दिले होते. त्याची तात्काळ दखल घेत नगरपरिषदेने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थकीत हप्ते जमा केले.
अतुल पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता - गेल्या काही महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. घरकुल याजनेचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी ता.यावल येथुन वितरित करण्यात येतात पण बँकेच्या तांत्रिक अडचणी मुळे अनुदान रखडलेले होते.बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावी यांचेशी संपर्क करून लाभार्थ्यासह बँक समोर आंदोलनं करु असा इशारा अतुल पाटील यांनी दि.७ जून २०२४ रोजी दिला होता.त्याची दखल घेऊन उशीरा का होईना लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाल्याने लाभार्थी आनंद व्यक्त करीत आहेत.या पुढे उर्वरीत घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी अशी सूचना नगरपालिकेकडे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की यावल शहरात सन २०१९ पासुन प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपावेतो ३५६ घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी २५२ घरकुले सुरु आहे तर १५५ घरकुल पुर्ण झाले आहेत. उर्वरीत ९७ घरकुले सध्या सुरु आहेत मात्र या घरकुल लाभार्थ्यांना मार्च २०२४ पासुन ते आजपर्यंत थकीत हप्ते मिळाले नव्हते.घरकुल लाभार्थी हे सर्वसामान्य लोक असून त्यांनी उसनवारी अथवा इकडून तिकडून लोकांकडून पैसे घेऊन घराची कामे पुर्ण केली आहेत. म्हणून त्यांना लवकरात लवकर थकीत हप्ते वितरित करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी माकोडे यांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना पत्र देऊन रखडलेले अनुदानाचे हप्ते लाभार्थी यांचे बँक खात्यात जमा झाले असुन आपण आंदोलनं करु नये असे विनंती वजा लेखी पत्र असून पाटील यांना दिले.



