रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : "एस.टी. पास थेट तुमच्या शाळेत" या रा.प. महामंडळाच्या विशेष मोहिमेला सुरुवात झालेली आहे. बाहेरगावाहून येऊन शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना आपली मोफत पास थेट शाळेत मिळणार असल्याने मोठा आनंद झालेला आहे. विद्यार्थ्यांना ३३.३३% रक्कम भरून आपल्या गावाहून शाळेत जाण्यासाठी एस. टी. च्या मासिक प्रवासासाठी पासची सवलत मिळते. तसेच पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना १००% सवलत देऊन मोफत पासेसचे वितरण रा.प. महामंडळाकडून करण्यात येते.[ads id="ads1"]
सध्या महामंडळाची एस.टी. पास थेट शाळेत या मोहिमेची चांगलीच चर्चा सुरू असल्याने जिल्ह्यात काही आगरांनी मोहिमेचा श्री गणेशा केल्याचे दिसून येत आहे.
रावेर रा.प. आगाराने देखील रावेर शहरातील तसेच परिसरातील चिनावल, कुंभारखेडे, खिरोदा, वाघोदे, थोरगव्हाण इ. गावातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन अहिल्याबाई होळकर योजनेच्या मोफत पासेसचे वितरण सुरू केलेले आहे.[ads id="ads2"]
रावेर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. विजय पाटील यांच्यासह स्थानक प्रमुख श्री. जगदिश सोळंके, वाहतूक निरीक्षक श्री. संदीप तायडे व श्री. जयेश लोहार तसेच वाहतूक नियंत्रक श्री. एस.के. शेख, श्री. वाय. आर. जोशी, श्री. एस. के. पाटील, श्री. पी. एस. मानकरे, प्रशिक्षणार्थी वाह. निरीक्षक श्रीमती देवयानी बारी यांनी रावेर तसेच परिसरातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेबद्दल माहिती देत शाळेतच ओळखपत्र, पासफॉर्म, तसेच मुलींच्या मोफत पासेसचे वितरण सुरू केलेले आहे.
कौतुकास्पद बाब म्हणजे माध्यमिक विद्यालय, कुंभारखेडा या शाळेतील विद्यार्थी आजपावेतो शालेय पास पासून वंचित होते. त्यामुळे या शाळेत रा.प. रावेर आगारातर्फे भेट दिली असता आगारातर्फे आलेल्या अधिकारीवर्गाचे विशेष स्वागत करण्यात येऊन देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत रा.प. प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक श्री. विजय पाटील तसेच स्थानक प्रमुख श्री. जगदिश सोळंके यांनी सवलती विषयी संपूर्ण माहिती देऊन शाळेतच ओळखपत्र, फॉर्म व मोफत पासेसचे वितरण केले. सर्व शाळांनी बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची यादी सादर करून शक्य तितक्या लवकर सदर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन रावेर आगाराचे आगार व्यवस्थापक केले आहे.




