रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक १५ जून शनिवार रोजी शाळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जि.प.शाळा-शिंगाडी येथे इ.१ली मध्ये नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू देवचंद कोजगे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच अध्यक्षांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.[ads id="ads1"]
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड मिठाई व खिचडी चा आहार देण्यात आला.शाळेत शाळापूर्व पालक सभा व शाळा पूर्व तयारी मेळावाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. विद्यार्थीकडून विकास पत्रे भरून घेण्यात झाली.[ads id="ads2"]
कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करायासाठी मुख्याध्यापक माळी सर व उपशिक्षक निकम सर यांनी मेहनत घेतली.



