यावल-रावेर तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांचे दाखले प्रलंबित.प्रांताधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष :पालक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील ) फैजपूर भाग प्रांताधिकारी सुट्टीवर असल्याने तसेच प्रभारी प्रांताधिकारी यांचा " थम " कार्यान्वयीत न झाल्याने यावल रावेर तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांचे विविध दाखले प्रलंबित झाले आहेत आणि शैक्षणिक कामे मुदतीत व्हायलाच पाहिजे असे असताना सुद्धा फैजपूर उपविभागीय कार्यालयातून  गेल्या पंधरा-वीस दिवसापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून प्रांताधिकारी,व त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध पक्ष,गटातटाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा यावल रावेर तालुक्यात विद्यार्थी पालकातून होत आहे.[ads id="ads1"] 

         फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवयानी यादव या रितसर सुट्टीवर गेल्या आहेत त्यांचा प्रभारी पदभार म्हणून दुसऱ्या एका महिला मोरे नामक अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे परंतु दाखले देण्याकामी  " थम "ची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट,नॉन क्रिमिनियल, सेंट्रल कास्ट, इत्यादी दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींचे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.[ads id="ads2"] 

  पर्यायी विद्यार्थ्यांसह पालक वर्गात नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून यावल रावेर तालुक्यात एक जबाबदार अधिकारी नसल्याने आणि अधिकाऱ्याचा "थम" तात्काळ कार्यान्वयीत का होत नाही..? किंवा का झाला नाही..? याकडे   लोकप्रतिनिधी आणि अनेक गट तटातील पदाधिकारी याचे दुर्लक्ष होत असल्याचे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.

हेही वाचा : - नाशिक विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने जळगाव जिल्ह्यात केलेली कारवाई संशयास्पद..?

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!