अखेर माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या उपस्थितीत किनगाव बु.येथील महिला सरपंच निर्मला पाटील यांनी दिला राजीनामा : तब्बल एक वर्ष झाला विलंब

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील ) किनगाव येथील माजी आमदार रमेश दादा चौधरी यांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या खास उपस्थितीत अखेर किनगाव बुद्रुक येथील सरपंच निर्मला संजय पाटील यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा आज सोमवार दि.१० रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला. [ads id="ads1"]  

       किनगाव बु. येथील ग्रा.पं. सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर सरपंच निवड करताना अडीच वर्ष निर्मला संजय पाटील,त्यानंतर दीड वर्ष भारती प्रशांत पाटील,आणि शेवटचे एक वर्ष स्नेहल मिलिंद चौधरी यांना सरपंचपद देण्याचे सर्व सदस्यांनी एकमताने आप-आपसात आणि ते सुद्धा माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या उपस्थितीत निश्चित केले होते.परंतु निर्मला संजय पाटील यांनी मुदत संपल्यानंतर एक वर्ष इतका जास्त कालावधी झाल्यावर सुद्धा राजीनामा न दिल्याने गेल्या तीन दिवसापूर्वी किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे एकूण १२ ते १३ सदस्यांनी आपल्या आवडत्या धार्मिक स्थळी आणि अज्ञातस्थळी सहल काढल्याची माहिती विद्यमान सरपंच निर्मला पाटील व त्यांचे पती संजय पाटील यांना माहित पडल्याने तसेच आता त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला जाईल म्हणून त्यांनी तात्काळ यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे आज सोमवार दि.१० जून २०२४ रोजी माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला.यामुळे सरपंच पदासाठी ज्यांना शब्द दिला होता त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. [ads id="ads1"]  

       आता सरपंच पदाची निवड करण्यासाठी पुढील कायदेशीर कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याने किनगाव बुद्रुक ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads2"]  

       किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये गेल्या दोन-तीन वर्षाच्या कालावधीत एका माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मार्गदर्शनाखाली जी विकास कामे झाली ती विकास कामे संबंधित ग्रामसेवकाने जिल्हा परिषद, पंचायत समिती,ग्रामपंचायत अटी शर्ती नियमानुसार केली आहेत किंवा नाही..? किंवा झालेली कामे निकृष्ट प्रतीची झालेली आहेत का..? याची चौकशी विद्यमान सरपंच, सदस्य करतील किंवा नाही याकडे संपूर्ण किनगाव बुद्रुक परिसराचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!