यावल ( सुरेश पाटील )
यावल येथील यावल न.प. संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इ. ११ वी विज्ञान मध्ये प्रवेश घेवू इच्छिणारे विदयार्थी- विदयार्थीनी तथा पालकाना साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील यांनी पुढील प्रमाणे वीस दिवसाचा वीस कलमी कार्यक्रम निश्चित केला असून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.[ads id="ads1"]
शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिलेल्या सुचनेनुसार इ. ११ वी विज्ञान प्रवेशाच्या कार्यप्रणालीनुसार खालील प्रमाणे इ. ११ वी विज्ञान प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येत. आहे.नमुद केलेल्या तारखेनुसार कार्यवाही होणार आहे.त्यामुळे मुदतीनंतर आलेले कोणतेही. अर्ज स्विकारण्यात येणार नाही.याची संबधितांनी गांभीर्याने नोद घ्यावी.[ads id="ads2"]
प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना वितरित करणे व विद्यार्थ्यांकडून जमा करण्याची प्रक्रिया दि.११ जून ते १४ जून पर्यंत २०२४ आहे, अर्जाची छाननी करणे संवर्ग निहाय प्राप्त अर्जानुसार सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करणे दि.१९ जून २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत.,
पहिली संवर्ग निहाय गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी तयार करून ती यादी प्रदर्शित करणे दि.१९ जून २०२४ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे दि.२२ जून २०२४, रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करणे दि.२४ जून, रिक्त जागी दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे २५ जून, रिक्त जागी तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करणे २६ जून दुपारी ४ वाजे पर्यंत, रिक्त जागी तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे दि.२७ जून, रिक्त जागी चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करणे दि.२८ जून सायंकाळी ४ वाजेपर्यंत, रिक्त जागी चौथ्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही शिल्लक राहिलेल्या जागा प्राप्त प्रवेश अर्जानुसार गुणांनुक्रमे भरणे दि.२९ जून,मा. शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची यादी व संवर्ग निहाय यादी प्रवेश दिलेल्या दिनांकासह सादर करणे १ जुलै २०२४ , प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देणे दि.६ जुलै २९२४ रोजी. अशाप्रकारे शैक्षणिक वर्ष सन २०२४- २५ करीता इयत्ता ११ वी विज्ञान प्रवेशाचे वेळापत्रक साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांनी निश्चित केले आहे.