यावल ( सुरेश पाटील )
जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका सौ.मंदाकिनी राजेंद्र पाटील या नुकत्याच दि.३१ मे २४ रोजी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेत.आपल्या ३३ वर्षाच्या कालखंडात त्यांनी आपली सेवेची सुरुवात अडावद ता.चोपडा येथुन १९९१ पासुन सुरु केली.[ads id="ads1"]
त्यानंतर त्यांनी यावल तालुक्यात डांभुर्णी,धानोरा येथे काही वर्ष सेवा दिली.त्यानंतर किनगाव येथे २२ वर्ष सेवा देऊन दि.३१ मे २०२४ रोजी ३३ वर्ष अखंड सेवा देऊन सेवानिवृत्त झालेत.यानिमित्ताने त्यांचा जिल्हा परिषद मराठी शाळा व कन्या शाळेच्या वतीने निरोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.सौ.मंदाकिनी राजेंद्र पाटील या किनगाव लोकमतचे पत्रकार आर.ई.पाटील सर यांच्या पत्नी आहेत.