ऐनपुर ता रावेर(विजय अवसरमल)
तालुक्यातील ऐनपुर येथे गेली दोन दिवस झाले ट्यूब वेलची इलेक्ट्रीक मोटर जळाल्याने व पाईप लिकीज झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून एकाच ट्युबवेलचा पाणी पुरवठा सुरू आहे ग्रामपंचायत मालकीच्या पाणी पुरवठा केला जाणाऱ्या पाण्याच्या टाकी वरून बाहेर गावातून केळी भरण्यासाठी येणाऱ्या केळी व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायतीची विशिष्ट रकमेची पावती भरून ट्रकमधील टाकीमधे पाणी भरले जात आहे एकीकडे मोटर जळाल्याने नागरिकांना पुरेसे पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरी कडे बाहेरील केळी व्यापारी त्यांच्या विशिष्ट कामासाठी पाणी भरून घेऊन जात आहे. [ads id="ads1"]
सदर समस्येबाबत ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यांच्या कडे काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली की आम्हाला पिण्याचे पाणी नाही व तुम्ही खुशाल बाहेरच्या व्यापाऱ्यांना पाणी उपलब्ध करून देत आहे असे ग्रा पं सदस्य किशोर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.पाईप लिकिज आणि इलेक्ट्रीकल मोटर जळाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. [ads id="ads2"]
मात्र दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या केळी व्यापाऱ्यांना १००रुपये रकमेची पावती घेऊन ग्रामपंचायत तर्फे केळी धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे आणि गावातील नागरिक मात्र पिण्याच्या पाण्याशिवाय कोरडेच आहेत.केळी व्यापाऱ्यांना पाणी पुरवठा बंद करून गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा ही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे
प्रतिक्रिया
ट्युबवेलची इलेक्ट्रीकल मोटर जळाल्याने व पाईप लिकीज झाल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे लवकरच ट्युबवेलची मोटर दुरुस्त करून गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल
अमोल महाजन
सरपंच , ऐनपुर