यावल ( सुरेश पाटील )
यंदा मे २०२४ या महिन्यात जास्त तापमानाच्या निकषात यावल तालुक्याचा समावेश न झाल्याने हा केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला. हवामान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर आणि कुचराई केल्याने चौकशी करून यावल तालुक्याचा समावेश करावा अन्यथा तालुक्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी फैजपुर भाग उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला.[ads id="ads1"]
त्यांनी आज दि.१० जून २०२४ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या मे महिन्या मध्ये सलग पाच दिवस ४५ अंशापेक्षा अधिक तापमान जळगाव जिल्ह्यात होते.त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकुण ५१ महसूल मंडळ समाविष्ट झाले असून यावल तालुक्यातील एकही महसूल मंडळाचा समावेश नाही.[ads id="ads2"]
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तापमान ४५ अंशापेक्षा जास्त असताना फक्त यावल तालुक्यात कमी तापमान कसे..? हवामान केंद्रातील कर्मचारी कामात कुचराई करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले यास जबाबदर कोण ? या प्रकरणाची गंभार दाखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा तालुक्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात डॉक्टर फेगडे यांनी म्हटले आहे.