ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर; ओपीडी सिएचओंच्या जोरावर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपुर प्रतिनिधी :- विजय एस अवसरमल

 ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असून एक वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याचे समजते परंतु  या ठिकाणीच वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ कुणाल पाटील हे सतत गैरहजर असतात व डॉ.कुणाल पाटील उपकेंद्रात असलेल्या सिएचओना फोन करून ऐनपुर केंद्रावर जाण्यास ओपिडी काढायला लावतात म्हणजेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे सीएचओंच्या जोरावर चालल्याचे चित्र आहे. दि ८ शनिवार रोजी ओपिडी वेळ होऊन सुद्धा डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे बरेचसे रुग्ण हे परत निघून गेले.दवाखान्याची वेळ होऊन सुद्धा फक्त मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. [ads id="ads1"]  

 वैद्यकीय अधिकारीच जर नियमित आणि वेळेवर येत नसतील तर इतर स्टाफ वेळेवर येणार कसा,रुग्णांना वळेवर सेवा मिळणार कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.तसेच औषधनिर्माण अधिकारी सुध्दा अधूनमधून गायब होत असतात प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाईच औषधीचे वाटत करीत असतात

तसेच रात्री अपरात्री काही एमर्जंसी रुग्ण आल्यावर रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात मग शासनाने इमारतीसह आरोग्यावर लाखो रुपये खर्च करून सुद्धा रुग्णांना योग्य वेळेवर उपचार मिळत नसेल तर फायदा काय? याबाबत वरिष्ठ आरोग्य आधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी वाघोदा येथे  गॅस्ट्रोची लागण लागली होती तेथे आरोग्य यंत्रणेने यावर उपाय योजना करुन नियंत्रण मिळवले आहे त्याप्रमाणे ऐनपुर येथे घडल्यास जबाबदार कोण राहील लाखो रुपये खर्च करून कर्मचाऱ्यांना सुसज असे निवासस्थान बांधकाम केलेले आहे परंतु हे निवासस्थान खाली पडलेल्या स्थितीत आहेत एखादा कर्मचारी सोडल्यास कोणी ही कर्मचारी वास्तव्यास नाही या ठिकाणी निवासी डॉक्टर व कर्मचारी असावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.[ads id="ads2"]  

*(प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच आणि पत्रकार यांची भेट)*

याच दरम्यान रुग्णांची सततची तक्रार बघता ऐनपुर गावाचे सरपंच तसेच पत्रकार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विचारपूस केली तसेच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी हजर नव्हते मोजकेच कर्मचारी उपस्थित होते तर सरपंच अमोल महाजन तसेच पत्रकार यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी अजय रिंढे यांच्याशी सदर समस्याबाबत संपर्क केला

*प्रतिक्रिया*

 ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रारी वाढल्या आहेत या तक्रारीची दखल घेतली जाईल व गैर हजर कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल..

  डॉ.अजय रिंढे

तालुका वैद्यकीय अधिकारी रावेर

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!