रावेर तालुक्यातील १९ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सावदा पोलिसांत गुन्हा दाखल 

सावदा प्रतिनिधी (मुबारक तडवी) :  सावदा तालुका रावेर येथील शहरात एका भागातील रहिवासी ‌ असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा घरात कोणी नसतांना हात पकडून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना सोमवारी सकाळी ११ वाजे च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलीसांनी (Savada Police) मंगळवारी दुपारी १:३० वाजता सावदा पोलीस ठाण्यात (Savada Police Station) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की, सावदा येथील (Savada City) १९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह राहते सोमवारी २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता तरुणी घरात एकटीच असल्याचे  पाहून गावातील रहिवासी  शकील शब्बीर मोहम्मद वय-३८ हा तिच्या घरात घुसला व तिला हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने तिचे नातेवाईकांना सांगितली.[ads id="ads2"] 

   त्या घटने संदर्भात पिडीत तरुणीसह नातेवाईक यांनी सावदा पोलीस ठाण्यात(Savada  Police Station) धाव घेतली व तक्रार दिली. त्यानुसार पीडित तरुणीच्या दिलेल्या फिर्यादीवरून शकील शब्बीर मोहम्मद याच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात (Savada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश पाटील करीत आहे.

हेही वाचा : जळगांव जिल्ह्यातील तीन सपोंनींची बदली : सावदा पोलिस स्टेशनचे जालिंदर पळे यांची बदली कोल्हापूरला   

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!