स्वामी स्पोर्ट्स क्लब रावेर च्या महिला खेळाडूंनी पुणे येथे राज्यस्तरीय रब्बी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :

      पुणे बालेवाडी येथे घेण्यात आलेल्या दि.14 जून ते 15 जुन 2024 रोजी राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेत      श्रुती दिनेश महाजन ,पूजा राजेश लोहार  यांनी पुणे जिल्ह्याचा नेतृत्व करून संघाला तृतीय क्रमांक पटकावून दिला.[ads id="ads1"] 

सदर स्पर्धेत स्वामी स्पोर्ट्स क्लबच्या महिला खेळाडूंनी दणदणीत विजय मिळवून  आपलं व आपल्या क्लबचे नाव लौकिक केले. खेळाडूंना मार्गदर्शक  श्रीकांत महाजन सर, प्रितम पाटील सर,विष्णू चारण सर, जीवन महाजन सर,श्री आनंदकुमार सपकाळ सर, यांचे सहकार्य लाभले.[ads id="ads2"] 

खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी   स्वामी परिवाराचे अध्यक्ष श्री. रविंद्र पवार सर,  सचिव सौ. मनीषा पवार मॅडम, मुख्याध्यापक (मा. वि.) श्री. राजू पवार सर, मुख्याध्यापिका (प्रा. वि.) धांडे मॅडम, पर्यवेक्षिका (मा. वि.) निळे मॅडम पर्यवेक्षक (स्वा. ई.) मैराळे सर, मंगेश महाजन सर, जयेश कासार, अमर रणसिंगे,व सर्व स्वामी स्पोर्ट्स परिवार व सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी  शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!