सावद्यात विमल गुटख्यांची विक्रीसाठी दुचाकीचा वापर: पोलिसांचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष ?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- महाराष्ट्र राज्यात सरकारने बंदी घातलेली असूनही विमल गुटख्या सह तंबाखूजन्य पदार्थ परप्रांतातून ट्रकांच्या माध्यमातून आपल्या राज्यात येत असतात यादरम्यान अशा गुटख्यांने भरलेली अनेक वाहने पोलिसांकडून पकडल्या जाण्याच्या कौतुकास्पद घटना जळगाव जिल्ह्यासह राज्यात दररोज समोर येते. [ads id="ads1"] 

परंतू रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विमल गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे तस्करांची मंडळींकडे स्थानिक पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्यामुळे की काय?मात्र कायद्याचा कोणतंच धाक न बाळगता सदरचा बेकायदेशीर व्यवसाय गुटखा माफिया एकदम ठंड डोक्याने चालवित असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.[ads id="ads2"] 

तसेच गेल्या दोन वर्षांत सावदा शहर व परिसरात सदर प्रकारे सुरू असलेल्या या अवैध कारभार करणाऱ्यांवर एकही कारवाई सावदा पोलिसांकडून होताना दिसून आली नसल्याने याबाबत आश्र्चर्यही व्यक्त केले जात आहे.

शहरात वाटेल त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्यासाठी भयंकर धोकादायक ठरणारा विमल गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकला जातो.यामुळे गुटखा खाण्याची लत तरुणांसह अल्पवयीन व शाळकरी मुलांना देखील लागली आहे.शहरात रात्री बे रात्री वाहनांच्या माध्यमातून येथील तस्करांकडे विमल सह विविध प्रकारचा गुटखा येतो.यानंतर तस्कर ज्या ठराविक व ठोस ग्राहिकांना हे विकतात ते देखील सदरचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याचा कोणतंच धाक न बाळगता मोठ मोठ्या पिशव्यात ठेवून स्वत:च्या दुचाकीवर सावदा शहर व परिसरातील गल्लीबोळात असलेल्या लाहन मोठ्या दुकान चालक सह टपरीधारकांना उघडपणे विक्री करतात.व यासाठी त्यांना कोणाचे अभयदान   आहे?याबाबत सावदा टावून मधील पोलिस दादांनी धृतराष्ट्रची भुमिका घेण्या मागचे कारण काय?असे यक्षप्रश्न भेडसावत आहे.तरी या गंभीर गोष्टींकडे सहा.पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी त्वरित लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!