शांततेत बकरी ईद साजरी करा – पो.नि.प्रदीप ठाकुर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

यावल येथील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सण साजरा करताना शांततेत आणि समाजात कोणताही ताण-तणाव न ठेवता तसेच कुर्बानी देताना आणि त्यानंतर स्वच्छता राखावी असे आवाहन यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आज रविवार दि.१६ जून २०२४ रोजी आयोजित शांतता कमिटी बैठकीत सदस्यांना व नागरिकांना केले आहे.[ads id="ads1"] 

             बकरी ईद सण साजरा करताना विविध धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी घेवुन सर्व नागरीकांनी शहरात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करावी.

         १७ जुन रोजी मुस्लिम समाज बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशन आवारात सकाळी ११ वाजता येथील पोलीस ठाण्याचे आवारात शांतता समिती सदस्यांची सभा आयोजित केली होती, बैठकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक ठाकुर म्हणाले बकरी ईद दिवशी दोन धर्मियामधे कोणताही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. [ads id="ads2"] 

  तसेच कुर्बानी देताना आणि त्यानंतर स्वच्छतेला महत्त्व देऊन नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याबाबत दक्षता बाळगावी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाईल.यावल शहरात कुठे कोणतीही घटना घडल्यास किंवा घडणार असल्यास त्याबाबत जे प्रत्यक्षात घडले आहेत तेच पोलिसांना सांगावे.व्हाट्सअप फेसबुक या प्रसिद्धी माध्यमातून कोणतीही अप्रिय पोज किंवा लिंक टाकुन नागरिकांमध्ये गैरसमज आणि त्यांच्या भावना दुखावल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. जेणेकरून कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम ठेवतात येईल.

         कुर्बानी देताना काय काय दक्षता बाळगावी याबाबतचे अमोल मार्गदर्शन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले. तसेच वेस्टेज मटेरियलची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या.

यावल तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आर.सी.भुगुरे, शांतता समितीचे सदस्य डॉ. निलेश गडे,हाजी शब्बीर खान, हबीब मंजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शांतता समितीच्या बैठकीस जेष्ठ शांतता समिती सदस्य हाजी शब्बीर खान,भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, यावलचे माजी उपनगराध्यक्ष हाजी इकबाल खान नसीर खान,भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी,शे.आतीम मो.रफीक, हाजी गफ्फार शहा,अय्युब खान शब्बीर खान, मो.शफी,गुलाम रसुल हाजी दस्तगीर, हबीब मंजर,रहीम रजा,सईद शाह रहेमान शाह (भुरा ), समीर खान,शे.युसुफ, मोहसीन खान,पराग सराफ यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!