रावेर प्रतिनिधि (सलीम पिंजारी )
रावेर न्यायालय कक्षेत साकारल्या जाणाऱ्या या अनोख्या संकल्पनेचे अनुकरण प्रत्येकाने करावे. त्यामुळे जागतिक पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल. यासोबत न्यायालय परिसर सुंदर, सुशोभित वहरीत व्हावा या हेतूने हिरवांकुर फाऊंडेशन, नाशिक च्या संकल्पनेतून साकार होत असलेले *हर घर किसान* व *वृक्ष दत्तक* अभियानात सक्रियपणे सहभाग घेऊ असा मनोदय जिल्हा जळगाव येथील रावेर तालुका न्यायालयातील मुख्य न्यायाधीश माननीय प्रवीण प्रभूलाल यादव, कुटुंबप्रमुख दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्र वर्ग, यांनी जागतिक पर्यावरण दिवसाच्या औचितत्याने आयोजित प्रतीकात्मक वृक्षारोपण सोहळ्याप्रसंगी केले.[ads id="ads1"]
यावेळी नाझर श्री चंदू बिऱ्हाडे, सीनियर क्लर्क श्री दिनकर इंगळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री बी डी निळे, सेक्रेटरी श्री के डी पाटील, सर्व विधीज्ञ, सेवक वृंद व हिरवांकुर टीमचे कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत, श्री शक्तिसिंग सोहनी, डॉ राजेंद्र आठवले व इतर मान्यवर उपस्थित होते.[ads id="ads2"]
पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असताना पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जागतिक पर्यावरण दिवसाच्या शुभ दिनी भारतीय प्रजातीचे आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त वृक्ष लावून न्यायालय परिसर हिरवागार व सुशोभित करण्याचा मानस माननीय न्यायाधीश महोदयांनी व्यक्त केला. यावेळी हिरवांकुर फाउंडेशन नाशिक चे संस्थापक अध्यक्ष श्री निलयबाबु शाह, सौ नलिनी शाह, सौ राखी शाह, आर्किटेक्ट किंजल शाह यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून साकार झालेल्या *हर घर किसान* व *वृक्ष दत्तक* अभियानाची मुहूर्तमेढ करण्यात आली. या अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी ग्रीन सिटी जळगाव, सामाजिक वनीकरण विभाग व बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जून ते १५ ऑगस्ट या सुमारे सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीत महावृक्षरोपण व वृक्षसंवर्धन अभियान चालविले जाणार आहे. अभियानाची संकल्पना नाविन्यपूर्ण असून वृक्षरोपणासोबतच लावलेल्या झाडाचे सुमारे पाचशे वर्ष बारकोड द्वारे फॉलोअप घेण्याची संकल्पना उदयास आलेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात समाजातील सरकारी, निमसरकारी व खाजगी संस्था, मंडळे, बॅंका आणि व्यक्तींना सोबत घेऊन जन आंदोलन करण्याचा मानस हिरवांकुर फाउंडेशन चा आहे. या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तराकडून कौतुक होत असून अनेक मदतीचे हात लाभात आहेत.



.jpg)