ग्रामस्थांच्या सतर्कतेने अवैध वाळू वाहतुकीचे अतिक्रमण उघड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 किनगाव येथून अवैध वाळू वाहतुकीचे २  ट्रॅक्टर 

तहसीलदार यांच्यासह महसूल पथकाने पकड

यावल  ( सुरेश पाटील ) आज शनिवार दि.८ जून २०२४ रोजी सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान जळगाव तालुक्यातील ईदगाव येथील  अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर यावल तालुक्यात किनगाव येथे येत असल्याची गुप्त खबर डांभुर्णी किनगाव परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या महसूल पथकास दिल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात जमा करून पुढील कारवाई सुरू केली.या कौतुकास्पद झालेल्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीत सुद्धा इतर क्षेत्राप्रमाणे अतिक्रमण होत असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

       याबाबत सविस्तर माहिती अशी की ईदगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर किनगावात येत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी व यावल येथील तलाठी ईश्वर कोळी, पिंपरुड येथील तलाठी श्वेता ससाणे,डोंगर कठोरा येथील वसीम तडवी,आडगाव येथील राजू गोरटे यांनी तात्काळ किनगाव येथे जाऊन प्रवेश द्वारा जवळ ईदगाव येथील मनोज विश्वनाथ कोळी विवेकानंद मधुकर पाटील या दोघांचे अवैध वाळूचे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जमा केले.[ads id="ads2"]  

        शहरात व ग्रामीण भागात अनेक खाजगी बांधकामासह शेती शिवारात,शासकीय जागांवर,रस्त्यांच्या आजूबाजूला छोटे-मोठे अनेक व्यवसायिकांचे ज्याप्रमाणे अतिक्रमण सुरू आहे त्याचप्रमाणे आता तापी नदी किनारपट्टीवरील तसेच गिरणा नदी परिसरातून आजूबाजूच्या तालुक्यातून बरेच अवैध वाळू, व गौण खनिज वाहतूक करणारे यावल तालुक्यात अवैध वाळू व अवैध गौण खनिज वाहतुकीत अतिक्रमण करीत असल्याने याचा ताण मात्र आता महसूल व पोलीस विभागावर पडत असल्याचा दिसून येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!