कॅटल ट्रॅकमुळे रुग्ण,ज्येष्ठ नागरिकांना,वाहनधारकास मोठा अडथळा
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भूषण फेगडे यांनी वेधले लक्ष
यावल ( सुरेश पाटील ) येथील ग्रामीण रुग्णालयात मेन प्रवेश द्वारात कॅटलट्रॅक जे आहेत ते नादुरुस्त आणि खोलगट झाल्याने रुग्णालयात येणाऱ्या शेकडो रुग्णांना,ज्येष्ठ नागरिकांना,वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून या ठिकाणी अप्रिय घटना घडू शकते तसेच ग्रामीण रुग्णालयात ऐन उन्हाळ्यात पंखे बंद आणि नादुरुस्त असल्याने ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक आणि जळगाव जिल्हा सल्ला चिकित्सक यांनी लक्ष केंद्रित करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भूषण नेमाडे यांनी केली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती यावल ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण औषध उपचार घेण्यासाठी येत असता आणि काही रुग्ण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल असतात सध्या उष्णतेचे तापमानाचे प्रमाण जास्त असल्याने रुग्णालयात पंख्याची सुविधा आवश्यक आहे काही पंखे नादुरुस्त आणि बंद पडल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.[ads id="ads2"]
रुग्णालयाच्या प्रवेश द्वारा जवळ कॅटल ट्रॅकची अत्यंत दुर्दशा झाल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना ज्येष्ठ नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होऊन या ठिकाणी अप्रिय घटना घडू शकते त्यामुळे रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी तातडीने या ठिकाणी पर्यायी व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भूषण नेमाडे यांनी केली आहे.