किनगाव बु. सरपंच पदाचा राजीनामा उशिरा का होईना पण दिला..?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील )

तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील निर्मला संजय पाटील यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा ठरलेल्या मुदतीत न देता उशिराने का होईना पण दिला त्यामुळे माजी आमदार रमेशदादा समर्थकांमध्ये काही प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे किनगाव परिसरात बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

        गेल्या अडीच वर्षांपूर्वी किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी निवड करताना निर्मला संजय पाटील यांना अडीच वर्ष,भारती प्रशांत पाटील यांना दीड वर्ष, आणि स्नेहल मिलिंद चौधरी यांना एक वर्ष सरपंचपद देण्याचे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते.[ads id="ads2"]  

 परंतु निर्मला संजय पाटील यांच्या पतीने आपल्या राजकारणाच्या जोरावर दिलेल्या शब्दाला मान न देता तब्बल एक वर्ष विकास कामांसाठी टाईमपास केल्याचे संपूर्ण किनगाव परिसरात बोलले जात असून किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे इतर काही सदस्य व इच्छुक सरपंच पदासाठी असलेल्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत होती. 

        याच माध्यमातून गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य नाशिक वणी येथील आई सप्तशृंगी देवी मंदिराच्या दर्शनासाठी जाऊन त्या ठिकाणी सर्वांनुमते विचार करून रणनीती आखली, यामुळे निर्मला संजय पाटील यांच्याबाबत यावल पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करायचा किंवा नाही..? याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या असता पुन्हा निर्मला संजय पाटील यांनी बिना तारखेचा राजीनामा संबंधितांकडे देऊन पुन्हा आठ दिवसाची  मुदत मागून ( राहिलेले कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी ) घेतल्याची चर्चा संपूर्ण किनगाव परिसरात असल्याने आता माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील यांच्या पत्नी सौ.भारती प्रशांत पाटील केव्हा सरपंच होणार..? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे.निर्मला पाटील यांनी अडीच वर्षा ऐवजी तीन वर्ष चार महिने कामकाज केल्याने ठरलेल्या कालावधीप्रमाणे आता भारती प्रशांत पाटील व स्नेहल मिलिंद चौधरी यांना आपापसात काही महिन्यांसाठी तडजोड करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. 

     किनगाव परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांची प्रसिद्धी नुकतीच झाल्याने या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!